Headlines

Global Maharashtra Breaking News

संजू परब यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाला पुन्हा धक्का; बांद्यात शिंदे शिवसेनेत प्रवेश…

⚡बांदा ता.०२-: असनीये घारपी येथील शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत बांदा येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यामध्ये उबाठा शाखाप्रमुख मुरलीधर ठिकार, बूथ प्रमुख भरत सावंत, कृष्णा सावंत, सुलक्षणा सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी युवासेना तालुका प्रमुख रियाज खान, उपतालुकाप्रमुख राकेश पवार, युवासेना उपतालुकाप्रमुख साहिल खोबरेकर,…

Read Full News

माझं सर्टिफिकेट वाचून दाखवा, जाहीर सत्कार करेन…

ॲड. मायकल डिसोजा:कोलगाव मतदारसंघात हुकूमशाही विरोधात जनतेचा रोष, नऊ तारखेला निकाल कळेल… ⚡सावंतवाडी ता.०२-: कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील विरोधकांकडून चुकीची माहिती देत माझ्यावर टीका केली जात आहे. माझ्या शिक्षणावर ते गेलेत. २०१७ ला देखील मी ॲडव्होकेट होतो. मुंबई विद्यापीठातून मी पदवी घेतली असून तेव्हा देखील मी शिक्षण लावल. मात्र, पदवी लावून कधी मिरवलो नाही. त्यामुळे…

Read Full News

“जनतेची साथ आमच्यासोबत, मोठी शक्तीही पराभूत करू”…

आमदार महेश सावंत:“तळवडे मतदारसंघात उद्धव ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकणार”.. ⚡सावंतवाडी ता.०२-: विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ हे निष्ठावंत कार्यकर्ते असून जनता त्यांच्या पाठीशी राहील असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केला. त्यांच्या प्रचारार्थ तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांनी सहभाग घेतला.‌ यावेळी ते बोलत होते. आम. सावंत म्हणाले, जनतेची साथ आम्हाला आहे….

Read Full News

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या भाजपा युवा नेते विशाल परब दोडामार्ग तालुका दौऱ्यावर…

⚡दोडामार्ग ता.०२-: भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशालजी परब यांचा उद्या मंगळवार दि. ३ फेब्रुवारी रोजी महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ दोडामार्ग तालुक्यात दौरा होत आहे. या दौऱ्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उत्साहीत असून उमेदवारांच्या विजयाचा विश्वास वाढला आहे. दि. ७ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जि. प. व पं. स. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपा युवानेते विशालजी परब यांचा हा…

Read Full News

वैभववाडी–कोल्हापूर रेल्वे मार्गाचे काम लवकरच होणार सुरू…

पालकमंत्री नितेश राणे:राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याचा मोठा फायदा कोकणच्या विकासाला होत आहे.. ⚡कणकवली, ता. ०२-:वैभववाडी–कोल्हापूर रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असून या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी साडे सहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी साडे तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने अर्थसंकल्पात केली असून उर्वरित निधीची तरतूद राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे,…

Read Full News

जनतेचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद…

अपक्ष जितेंद्र गावकर: नऊ तारखीला गुलाल हा आपलाच.. ⚡सावंतवाडी ता.०२-: सोनुर्ली गावात अपक्ष उमेदवार जितेद्र गावकर यांनी झंझावाती प्रचार केला. जनता माझ्या पाठीशी असून आपला विजय हा निश्चित आहे असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला.माजगाव पंचायत समितीसाठी जितेंद्र गावकर यांनी अपक्ष रिंगणात उडी घेतली आहे. ही जागा ओपनसाठी सुटली असतांना तेथे ओपन उमेदवार न देता…

Read Full News

माझी स्पर्धा विकास कामांवरच…

संदीप गावडे: डोअर टू डोअर प्रचारात जोरदार आघाडी… ⚡सावंतवाडी ता.०२-:तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली असून त्यांचा डोअर टू डोअर प्रचार जोरात सुरू आहे. या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले असून ‘कोणाच्या बाजूने मतदारांचा कौल जाणार?’ याकडे उत्सुकता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून संदीप गावडे यांनी…

Read Full News

मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळीत भीषण अपघात

कारच्या धडकेत महिला जागीच ठार:अवैध पार्किंगमुळे अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे.. ⚡​कुडाळ ता ०२-: मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी धुरी टेंबनगर येथे आज सकाळी ९:४५ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ६२ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. आशा सोनू धुरी असे मृत महिलेचे नाव असून, रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कारने त्यांना धडक दिल्याने हा अपघात घडला. दरम्यान…

Read Full News

त्यांच्या मागे कोणाची ताकद आहे हे मला नाही, पण नऊ तारखेला गुलाल हा माझाच…

महेश सारंग यांचा पलटवार: मी जर धमक्या वगैरे देत असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला माझी तक्रार करावी,. ⚡सावंतवाडी ता.०२-:आज मायकल डिसोजा यांना शिंदे शिवसेनेसह अपक्षांची ताकद घ्यावी लागत आहे, यावरूनच या मतदारसंघातील भाजपची खरी ताकद किती आहे हे स्पष्ट होते, असा पलटवार भाजपचे उमेदवार महेश सारंग यांनी आज येथे केला. त्यांच्या मागे आज नेमकी कोणाची…

Read Full News

तारकर्लीतील एमटीडीसी कार्यालयाला शॉर्ट सर्किटमुळे आग…

पहाटेची घटना:लाखोंचे नुकसान.. ⚡मालवण ता.०२-:मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कार्यालयाला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न…

Read Full News

You cannot copy content of this page