⚡बांदा ता.०२-: असनीये घारपी येथील शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत बांदा येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यामध्ये उबाठा शाखाप्रमुख मुरलीधर ठिकार, बूथ प्रमुख भरत सावंत, कृष्णा सावंत, सुलक्षणा सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावेळी युवासेना तालुका प्रमुख रियाज खान, उपतालुकाप्रमुख राकेश पवार, युवासेना उपतालुकाप्रमुख साहिल खोबरेकर, संजय बांदेकर, भाऊ वाळके, पांडुरंग नाटेकर, सागर धोत्रे, राहुल माने, प्रशांत जाधव, बाबा धुरी आदी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संजू परब यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
संजू परब यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाला पुन्हा धक्का; बांद्यात शिंदे शिवसेनेत प्रवेश…
