Headlines

Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्गचे योगशिक्षक शेखर बांदेकर यांना मानाचा ‘इंडियन आयकॉन अवॉर्ड 2026’ जाहीर…

​ ⚡सावंतवाडी ता.०८-: योगसाधनेच्या माध्यमातून समाजस्वास्थ्य सुदृढ करणाऱ्या सिंधुदुर्ग येथील फिटनेस योग अकॅडमीचे संचालक आणि प्रसिद्ध योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर यांना ‘इंडियन आयकॉन अवॉर्ड 2026’ देऊन गौरविण्यात आले आहे. राजस्थान येथील प्रतिष्ठित ज्ञान उदय फाउंडेशनच्या वतीने देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी ‘ऑनलाइन आणि ऑफलाइन योगवर्ग’ या श्रेणीतून श्री. बांदेकर…

Read Full News

पर्यटकाच्या कारची दुचाकीला धडक देऊन पलायन…

जेल नजदीकची घटना: तिघे जखमी, वाहनला गवळी तिठ्यावर पकडले.. ⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी कारागृहाजवळ एका पर्यटकाच्या कारने दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरून पलायन केल्याची घटना आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान पळून गेलेली कार गवळी तिठा येथे पकडण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर न थांबता तेथून पळ…

Read Full News

श्री स्वामी समर्थ पालखी पादुका १२ फेब्रुवारी या १४ फेब्रुवारी या कालावधीत देवगड तालुक्यात…

⚡देवगड ता.०८-: श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा सोहळ्याचे आयोजन देवगड तालुक्यात १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत केले असून. स्वामीच्या पादुकांची पालखी या ठिकाणी भाविकांसाठी दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे. श्री स्वामी भक्तांनी स्वामींच्या पालखी पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा.श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २९ वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर पालखी परिक्रमा कार्यक्रम…

Read Full News

कणकवलीत पुन्हा जनावरांचा संशयास्पद मृत्यू…

पंधरा दिवसांत दुसरी घटना; विषबाधेचा संशय, प्रशासनासमोर गंभीर प्रश्न.. ⚡कणकवली ता.०८-:काही दिवसांपूर्वी कणकवली शहरात पाच जनावरांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. वैद्यकीय अहवालानुसार विषबाधेमुळे हा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशातच आज पुन्हा एकदा कणकवली शहरात तीन म्हैशी मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची…

Read Full News

विशाल सावंत यांचा मित्रमंडळींकडून सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०८-: शुक्रवारी मध्यरात्री फॉरेस्ट ऑफिस परिसरातील गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध यंत्रणांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत सावंतवाडी गरड येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल सावंत यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत आपल्या खासगी पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने सर्वप्रथम आगीवर नियंत्रण मिळवण्याचे धाडसी काम केले. त्यांच्या या कार्याबद्दल मित्रमंडळींकडून त्यांचा सत्कार करण्यात आला….

Read Full News

गरिबांचा डॉकटर विभाच्या जाण्याने जिल्ह्याचे अपरिमित नुकसान ; दिलीप गिरप…

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ मेडिकल व्यावसायिक, वेंगुर्ला मुख्य बाजारपेठ येथील रघुवीर मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चे व्यवस्थापक विवेक उर्फ विभा खानोलकर यांचे आज शनिवारी मणीपाल गोवा येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याने संपूर्ण वेंगुर्ला शहरासह ग्रामीण भागात शोककळा पसरली आहे. गोरगरीब जनतेचा कैवारी हरपला, अशा प्रतिक्रिया आज संपूर्ण वेंगुर्ला शहरात…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात शांततेत सरासरी 69टक्के मतदान ; ओंकार ओतारी…

⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गण व 9 पंचायत समिती गट साठीएकूण सरासरी 69.03टक्के इतके शांततेत मतदान झाले. तालुक्यातीलएकूण 58,785 मतदारापैकी 40,579मतदारांनी( पुरुष 21,211 व 19368 स्त्री) मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती वेंगुर्ला निवडणूक निर्णय अधिकारी तथा वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली.वेंगुर्ला तालुक्यात शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद – पंचायत समिती…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात दुपारी 3.30 वा.पर्यंत 53 टक्के मतदान…

⚡वेंगुर्ला ता.०७-: तालुक्यात आज शनिवारी जिल्हा परिषद – पंचायत समिती साठी सकाळपासून 87 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया सुरु आहे. सकाळी 7.30 ते 9.30 वा. पर्यंत एकूण 9.98 टक्के इतके मतदान झाले होते. दुपारी 11.30 वाजेपर्यंत एकूण 24.61 टक्के इतके मतदान झाले आहे. तर दुपारी 1.30 वाजेपर्यंत 39.84 टक्के इतके मतदान झाले आहे.दुपारी 3.30 वाजेपर्यंत…

Read Full News

आरोंदा खरी येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहनांस अडथळा…

⚡सावंतवाडी ता.०७-: आरोंदा ते मळेवाडकडे जाणाऱ्या मुख्यरस्त्याच्या बाजूला आरोंदा खरी येथे काजूचे भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने वाहनांस अडथळा निर्माण झाला आहे.हे काजूचे पडलेले भले मोठे झाड आणि रस्त्याच्या समोर मोठे वळण असल्याने वाहनचालकांची धांदल उडत आहे.अचानक समोरून वाहन आल्यास ते दिसत नसल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे लवकरात लवकर हे झाड बाजूला करण्याची मागणी…

Read Full News

वेंगुर्लातील व्यापारी संघांचे अध्यक्ष विभा खानोलकर यांचे निधन…

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ मेडिकल व्यावसायिक, वेंगुर्ला मुख्य बाजारपेठ येथील रघुवीर मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चे व्यवस्थापक विवेक उर्फ विभा खानोलकर (वय 65) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज दुखःद निधन झाले. विवेक खानोलकर यांना गोवा येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात…

Read Full News

You cannot copy content of this page