Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस मशीन व टेक्निशियन वाढवावेत…

नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मागणी.. ⚡मालवण ता.१६-:मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस मशीनरी व टेक्निशियन पुरेशा प्रमाणात नसल्याने याठिकाणी डायलिसीससाठी रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत असून अनेक रुग्णांना ओरोस येथे जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णालयात डायलिसीस मशीन व टेनक्निशियन वाढवावेत, अशी मागणी मालवणच्या नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी…

Read Full News

कणकवलीत ” मराठा सांस्कृतिक भवन” उभारणार…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून मराठा सांस्कृतिक भवनाची निर्मिती:छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मुहुर्तावर पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार भूमिपूजन.. ⚡कणकवली ता.१६-:मराठा समाजातील भावी पिढीला प्रेरणा देणारा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष देणारा कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी समाजाचे नेते तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने मराठा सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. शहरातील २८ गुंठे शासकीय…

Read Full News

सत्तेच्या माध्यमातून विकासाची प्रत्येक हमी पूर्ण करू…

प्रभाकर सावंत:भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा कोळंब येथे सत्कार.. ⚡मालवण ता.१६-:केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. जिल्ह्यात खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आपल्याला विकास निधी कमी पडणार नाही. निवडणुकीत तुम्ही मतदारांना दिलेले विकासाचे प्रत्येक शब्द सत्तेच्या माध्यमातून पूर्ण केले जातील, अशी ग्वाही भाजप…

Read Full News

मालवणच्या श्री देव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी…

⚡मालवण ता.१६-: महाशिवरात्री निमित्त मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरातील शिवलिंगासभोवती पंधरा थरांची अक्षतांची (तांदळाची ) महापूजा बांधून महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाशिवलिंगासभोवती बांधन्यात आलेली ही अक्षताच्या महापुजा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती मालवण देऊळवाडा येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत पुराण वाचन, कीर्तन, पालखी मिरवणूक…

Read Full News

एमआयटीएम विद्यार्थ्यांची चिवला बीच व किल्ले सिंधुदुर्ग येथे स्वच्छता मोहीम…

⚡मालवण ता.१६-: मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट कॉलेज (MITM) च्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागामार्फत घेण्यात आलेल्या दोन दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी मालवणचा समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम राबवीत सामाजिक कार्याचा आदर्श जपला शिबिराच्या पहिल्या दिवशी मालवणमधील प्रसिद्ध चिवला बीच…

Read Full News

सिंधुदुर्गात दर महिन्याला ‘ऊर्जा मित्र’ बैठक…

⚡वैभववाडी ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या वेळेवर मार्गी लावण्यासाठी तसेच विज ग्राहक आणि विज अधिकारी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी तालुका स्तरावर व उपविभाग स्तरावर उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात यावे अशी लेखी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण…

Read Full News

कुडाळ नगरपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी १.०९ कोटी निधी मंजूर…

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.१६-: कुडाळ शहराचे विस्तारात असलेले स्वरूप पाहता नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पबाबत आमदार निलेश राणे यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून नगरपंचायतीस आवश्यक भूखंड उपलब्ध झाला असून स्वच्छ भारत अभियान नागरी २.० अंतर्गत रुपये १.०९ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती…

Read Full News

उपजीविकेच्या साधनाबरोबर छंदही जोपासा…

राजन नाईक :बॅ नाथ पै फिझिओथेरपी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात.. ⚡कुडाळ ता.१६-: उपजीविकेच्या साधनाबरोबर छंदही जोपासा. कलेची साधना करा. जगण्याचे मर्म सापडेल. असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार राजन नाईक यांनी काढले. बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या कलासंगम या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून श्री. नाईक बोलत होते. अतिशय उत्साहात कालसंगम स्नेहसंमेलन संपन्न झाले.बॅ नाथ पै फिझिओथेरपी महाविद्यालयाचे कलासंगम…

Read Full News

मच्छिमाराना बजवलेल्या नोटीसीबाबत मार्ग निघेल…

आम. निलेश राणे:कुडाळ प्रांत कार्यलयात झाली बैठक;मालवणमधील मच्छिमार व व्यावसायिकांना नोटिसा.. ⚡कुडाळ ता.१६:-: मालवण मधील मच्छीमार आणि मत्स्यव्यवसायीक यांना सीआरझेड उल्लंघन नोटीस बजवण्यात आली होती. त्या संदर्भात आज कुडाळ येथील उप विभागीय कार्यालयात आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसमोर मच्छीमाराना बजावलेल्या नोटीसीबाबत सुनावणी झाली. यामध्ये सकारत्मक चर्चा होऊन कायद्याच्या चौकटीत राहून मच्छीमार आणि व्यावसायिकांवर कठोर…

Read Full News

कुठ्ठाळी येथे कदंबा बस-दुचाकी भीषण अपघात; सातार्ड्याचे प्रशांत बागकर ठार…

⚡बांदा ता.१६-: नोकरीनिमित्त गोव्यात वास्तव्यास असलेले आणि सातार्डा (तरचावाडा) येथील मूळ रहिवासी प्रशांत गजानन बागकर (वय ५०) यांचा काल सकाळी गोवा येथील कुठ्ठाळी येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला.दुचाकी आणि गोवा परिवहन मंडळाची कदंबा बस यांच्यात झालेल्या या समोरासमोर धडकेमुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page