Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवणात २६ रोजी मराठी शुद्धलेखन स्पर्धा…

⚡मालवण ता.१७-:‘मराठी भाषा दिवस’ उपक्रमाच्या निमित्ताने रोटरी क्लब, मालवण यांच्यावतीने मालवण तालुकास्तरीय मराठी शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कन्याशाळा, मालवण येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी लेखणी, कागद व मजकूर आयोजकांकडून पुरविला जाणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना चषक व…

Read Full News

बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म भरण्याची विनामूल्य सोय…

⚡मालवण ता.१७-:मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमा अंतर्गत आरटीई दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना स्वयंअर्थ सहाय्यशाळा, विनाअनुदानित शाळांसाठी १७ फेब्रुवारी पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यासाठी १० मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था बार्टीतर्फे आरटीईचे फॉर्म विनामूल्य भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read Full News

पहिल्या ऊर्जा मित्र बैठकीचे उद्या (१८)आयोजन…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या मागणीला यश:वीज ग्राहकांना मांडता येणार आपल्या तक्रारी.. ⚡कुडाळ ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या वेळेवर मार्गी लावण्यासाठी तसेच विज ग्राहक आणि विज अधिकारी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी तालुकास्तरावर व उपविभाग स्तरावर उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी उर्जा मित्र…

Read Full News

बांदा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रत्नाकर आगलावे यांची बिनविरोध निवड

बांदा/प्रतिनिधीबांदा ग्रामपंचायत उपसरपंचपदी रत्नाकर आगलावे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांचा पक्षीय धोरणानुसार एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आज झालेल्या बांदा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये रत्नाकर आगलावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, श्रेया केसरकर, राजाराम उर्फ बाळू सावंत, तनुजा वराडकर,…

Read Full News

स्वच्छ आणि हरित गाव हेच खऱ्या अर्थाने सुखी आणि आरोग्यदायी गाव…

यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे प्रतिपादन:झाराप येथे खास गावसभा.. ⚡कुडाळ ता.१७-: गाव स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ सरकारी प्रयत्न पुरेसे नसून ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे. स्वच्छ आणि हरित गाव हेच खऱ्या अर्थाने सुखी आणि आरोग्यदायी गाव असते. असे मार्गदर्शन यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी  झाराप ग्रामपंचायत येथे केले  स्वच्छ व हरित थीमसाठी  झाराप ग्रामपंचायतचे  राष्ट्रीय स्तरावर नामांकन होणार…

Read Full News

काजू उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्याशी चर्चा…

⚡दोडामार्ग ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शेतकरी प्रतिनिधींनी सोमवारी कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची मालवण येथील ‘निलरत्न’ निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत काजू उत्पादन करताना येणाऱ्या अडचणी, सातत्याने घसरत असलेले विक्रीदर, वाढलेला उत्पादन खर्च, वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान तसेच बाजारात स्थानिक व आयात काजूमधील प्रतवारीचा प्रश्न आदी महत्त्वाच्या…

Read Full News

जिल्हा परिषदेत अपक्ष, ठाकरे शिवसेनेची मोट …

एकत्र येत स्थापन केला विरोधी गट.. ओरोस ता १७-: जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या भाजप आणि शिवसेना या सत्ताधाऱ्यांवर दबाव ठेवण्यासाठी अपक्ष निवडून आलेल्या सहा आणि ठाकरे शिवसेनेच्या तीन अशा एकूण नऊ जणांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद विकास आघाडी या नावाने गट स्थापन केला आहे. त्याचे पत्र मंगळवारी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. इन्सुली मधून अपक्ष म्हणून निवडून…

Read Full News

सोनुर्ली शाळा न.१ च्या भिंतीला मोठी भेग..

तात्काळ निर्णय घ्या ; प.स सदस्य जितेंद्र गावकर व शाळा व्यवस्थापन समितीची सीईओकडे मागणी .. ⚡सावंतवाडी ता.१७-: सोनुर्ली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या इमारतीच्या भिंतीला मोठी भेग पडली असून, ही भिंत कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी पंचायत…

Read Full News

जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पीएमश्री दत्त विद्या मंदिरच्या शिक्षकांचा सत्कार…

⚡वैभववाडी ता.१७-: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीनच्या स्पर्धेमध्ये पीएमश्री दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापकासह इतर शिक्षकांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.मुख्याध्यापक दिनकर केळकर अविनाश आवटे धावले मॅडम लांडगे मॅडम या चारी शिक्षकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन…

Read Full News

आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून घराघरात मिळणार आरोग्य सेवा…

विनासायास मिळणार उपचार.. ओरोस ता १७राज्यात वाढते कर्करोग, हृदयरोग आणि वृद्धापकाळाशी संबंधित आजार लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘राज्य पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमा’ची व्याप्ती वाढविण्याचा आणि तो अधिक सक्षम करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता केवळ रुग्णालयातच नव्हे, तर ‘आरोग्यवर्धिनी केंद्रां’च्या माध्यमातून गावागावात आणि रुग्णांच्या घरी जाऊन आवश्यक सेवा पुरविली जाणार आहे,…

Read Full News

You cannot copy content of this page