⚡वैभववाडी ता.१७-: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीनच्या स्पर्धेमध्ये पीएमश्री दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुख्याध्यापकासह इतर शिक्षकांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
मुख्याध्यापक दिनकर केळकर अविनाश आवटे धावले मॅडम लांडगे मॅडम या चारी शिक्षकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तेजस साळुंखे पत्रकार तथा सदस्य संजय शेळके दळवी मॅडम नंदू हुले राजू जाधव श्री जंगम शिंदे मॅडम आधी सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पीएमश्री दत्त विद्या मंदिरच्या शिक्षकांचा सत्कार…
