Headlines

Global Maharashtra Breaking News

बापर्डे येथे मोटरसायकल बोलेरो अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार…

⚡देवगड ता.१९-: बापर्डे तळेबाजार रस्त्यावर बापर्डे येशीची व्हाळी या ठिकाणी मोटरसायकलची समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीला धडक बसून झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार सागर फुलू चव्हाण(२३) रा.पळसंब आचरा ता.मालवण हा जागीच ठार झाला आहे.हा अपघात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वा.सुमारास घडला.या अपघाताची देवगड पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पळसंब येथील…

Read Full News

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे कोंडुरे येथे वन्यजीवांसाठी ‘वझर तळी’ पाणवठ्याची स्वच्छता..

⚡सावंतवाडी ता.१९-: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मळेवाड – कोंडूरे च्या वतीने शिवजयंती निमित्ताने वन्यजीवांसाठी पाणवठ्याची साफसफाई कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी सकाळी नऊ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मुर्तीपुजनानंतर कोंडुरे येथील जंगलात जाऊन “वझर तळी” या पाणवठ्यावर परिसर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. दिवसेंदिवस नष्ट होणारी वने यामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले असून,या नष्ट होणाऱ्या…

Read Full News

आरोस बाजार शाळेला श्रीकृष्ण ठाकूर यांच्या कडून प्रिंटर व शैक्षणिक साहित्य भेट…

⚡सावंतवाडी ता.१९-: आरोस बाजार येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर शाळेला मळगावचे सुपुत्र श्रीकृष्ण ठाकूर यांनी प्रिंटर भेट म्हणून दिला तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.यावेळी शा. व्य. समिती अध्यक्ष हेमंत कामत, उपाध्यक्षा सिया राऊळ तसेच सदस्य यावेळी उपस्थित होते.शाळेला सहकार्य करणारे श्रीकृष्ण ठाकूर यांचे शाळेच्या मुख्याद्यापिका नियोजिता अनिल नाईक यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजनंदा शिंदे…

Read Full News

ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती साजरी…

⚡मालवण ता.१९-:छत्रपती शिवाजी महाराज कि जय! जय भवानी,जय शिवाजी! असा जयघोष करत लेझीम नृत्य आणि ढोल ताशाच्या गजरात आणि भगव्या शाली, भगवे झेंडे, भगवे फेटे, परिधान करून आज मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मिरवणूक काढत किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव साजरा…

Read Full News

निलेश राणे यांच्या पुढाकारातून आचरा येथे नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.१९-:शिवजयंती निमित्तआमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून व सहकार्याने आचरा येथे आयोजित नेत्र तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उदघाटन आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी , रामेश्वर सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी शिवसेनेचे जयप्रकाश परुळेकर,रुपेश पाटकर, अभय भोसले,…

Read Full News

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये २१ फेब्रुवारीला राष्ट्रीय परिषदेचे आयोजन…

सलग आठवे वर्ष, तीनशेहून अधिक विद्यार्थी-संशोधकांचा सहभाग…. ⚡सावंतवाडी ता.१९-: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने सलग आठव्या वर्षी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या या परिषदेचा मुख्य विषय हा ‘औषध संशोधन व विकास प्रक्रियेत प्रगत तंत्रज्ञानाची भूमिका’ असा आहे. या परिषदेत पारंपरिक औषधी ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देत जागतिक दर्जाची…

Read Full News

सिंधुदुर्गात दर तीन महिन्यांनी घेतली जाणार आरोग्य शिबिरे…

नाम.नितेश राणे यांची मोठी घोषणा:मोफत तपासणी व औषधांमुळे गरीब रुग्णांना मिळणार मोठा दिलासा.. ⚡कणकवली ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या त्रुटींमुळे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे सर्वसामान्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी आता पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी गोव्याला धाव घ्यावी लागू नये, यासाठी आता दर तीन महिन्यांनी भव्य आरोग्य कॅम्प आयोजित…

Read Full News

कवठी येथे रुपेश पावसकर यांच्या हस्ते शिवरायांना अभिवादन…

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरी. ⚡कुडाळ ता.१९-: तालुक्यातील कवठी गावात मंदिर परिसरात असलेल्या महाराजांच्या पुतळ्याला नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी पुष्पहार अर्पण करून तमाम शिवप्रेमी यांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.यावेळी कु. मिहिर प्रफुल्ल वाडयेकर या बालकाने छत्रपती बाल शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती व सोबत इतर मुलांनी जिजाऊ माता व मावळे…

Read Full News

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡कुडाळ ता.१९-: येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या विशेषतः सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज जन्मापासून त्यांच्या जन्म पाळणा म्हणणं, अफजलखान भेट, आग्र्याहून सुटका, शिवरायांचा राजदरबार, अशा शिवचरित्रातील विविध प्रसंगांची रेलचेल असलेल्या सवेष सादरीकरणातून अतिशय रंगतदारपणे शिवजन्मोत्सव साजरा केला.प्रा. अरुण मर्गज यांच्या सहित शिक्षण संस्थेतील विविध प्राचार्यांच्या उपस्थितीमध्ये व त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून व…

Read Full News

चेंदवण हायस्कुल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा…

⚡कुडाळ ता.१९-: चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर ईशस्तवन व स्वागतगीत सुस्वरात सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय नाईक होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी महेश भरत खडपकर (अप्लाइड आर्ट्स…

Read Full News

You cannot copy content of this page