कवठी येथे रुपेश पावसकर यांच्या हस्ते शिवरायांना अभिवादन…

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरी.

⚡कुडाळ ता.१९-: तालुक्यातील कवठी गावात मंदिर परिसरात असलेल्या महाराजांच्या पुतळ्याला नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी पुष्पहार अर्पण करून तमाम शिवप्रेमी यांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.
यावेळी कु. मिहिर प्रफुल्ल वाडयेकर या बालकाने छत्रपती बाल शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती व सोबत इतर मुलांनी जिजाऊ माता व मावळे असा वेष परिधान केला होता. यावेळी नवनिर्वाचित नेरूर जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गावच्या उपसरपंच सौ. ऋतुजा रूपेश खडपकर, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर वाडयेकर, पु. प्रा. शाळा कवठी नं.१ मुख्याध्यापक श्री. परब सर, सौ.नारकर मॅडम, सौ. सावंत मॅडम, श्री. पालवे सर, देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन कवठकर, सचिव रूपेश खडपकर, खजिनदार मंगेश बांदेकर, माजी सरपंच रूपेश वाडयेकर, माजी उपसरपंच अरूण परूळेकर, दिलीप परूळेकर, रवी गोडकर, सौ. दिपाली गोडकर, राजन खोबरेकर, रमेश परूळेकर, दिलिप गोडकर, शेखर मेस्त्री, मधुकर खडपकर, गजानन कवठकर, अमित सांगळे, महेश वाडयेकर, उल्हास कवठकर, गणपत कवठकर,आदी ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक वृंद हजर होते.

You cannot copy content of this page