Headlines

Global Maharashtra Breaking News

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला राष्ट्रीय काँग्रेस नाहक विरोध करत आहे – नितेश राणे

*💫कणकवली दि.०५-:* अमेठीतून लढणारे राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवतात मग कोकणातील आंबा काजूला मध्यप्रदेश गुजरात सह संपूर्ण देशातील बाजारपेठ खुली करून देणारे मोदी सरकारचे कृषीविधेयक का नको ? असं थेट सवाल करत भाजपा आमदार नितेश राणें यांनी कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी कोकणातील हजारो शेतकरी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयावर ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ट्रॅक्टर मोर्चा काढणार…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 25 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह ….

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 536 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 231 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 25 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

रॉयल ब्रदर्स तर्फे अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

*💫सावंतवाडी दि.०५-:* रॉयल ब्रदर्स तर्फे खुल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ९ व १० जानेवारी रोजी होळीचा खुंट , जुनाबाजार येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ११ हजार १११ व चषक तर द्वितीय पारितोषिक ७ हजार ७७७ व चषक ठेवण्यात आले असून, या स्पर्धेची प्रवेश फी ६०० रुपये ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी…

Read Full News

सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचे तिकीट मिळण्यापूर्वी महेश सारंग यांनी करावा सहकाराचा अभ्यास

*शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांचा महेश सारंग यांना टोला *💫सावंतवाडी दि.०५-:* सहकारी संस्था व महेश सारंग यांचा दुरान्वये संबंध नसून, स्टंटबाजी या शब्दाचा अर्थ तरी महेश सारंग याना माहित आहे का? असा प्रश्न शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. सतिश सावंत स्टंटबाजी करतात असे म्हणणे देखील हास्यास्पद असल्याचे देखील ते…

Read Full News

निवडणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी मळगाव मध्ये पोलिसांचे संचलन…

*💫सावंतवाडी दि.०५-:* काल ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज उमेदवारांनी मागे घेतल्या नंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणांनी संचलन केले आहे. सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकी अनुसरून मळगाव बाजारपेठेतून पोलीस त्याचप्रमाणे दंगल नियंत्रण पथक यांनी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या…

Read Full News

अनैतिक व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी मनसे शिष्टमंडळानी कुडाळ पोलिस निरीक्षकांची घेतली भेट

*💫कुडाळ दि.०५-:* कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री. कोरे यांची आज मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असून, तालुक्यातील अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे स्मरणपत्र निवेदन दिले आहे. कुडाळ तालुक्यात गेले काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात जुगार, मटका, गावठीसह गोवा बनावटीची दारू विक्री यासारखे अनेक अवैध व्यवसाय फोफावू लागले आहेत. या अनैतिक व्यवसायावर काही पोलिसांचे वरदहस्त असल्याने प्रामाणिक…

Read Full News

बांदा दशक्रोशीत अवकाळी पाऊस

आंबा, काजूसह भात पिकाचेही मोठे नुकसान *💫बांदा दि०५-:* सोमवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास बांदा दशक्रोशीत कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आंबा, काजू बागायतीसह उडवी करून ठेवलेल्या भात पिकाचेही नुकसान झाले. सलग दोन वर्षे प्रशासनाने नुकसान भरपाईच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान कसे भरून येणार…

Read Full News

कणकवलीत पहाटे अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या

*💫कणकवली दि.०५-:* कणकवलीत मंगळवारी पहाटेपासून अवकाळी पाऊस पडला. मंगळवारी पहाटे साडेचार च्या सुमारास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कणकवली शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी बरसल्या. काजू आणि आंब्याला मोहोर येण्याच्या ऐन हंगामात पडलेल्या या पावसामुळे काजू आणि आंबा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे काजू- आंबा बागायतदार चिंतेत आहेत.

Read Full News

सावंतवाडीत अवकाळी पावसाची हजेरी

*💫सावंतवाडी दि०४-:* सावंतवाडी शहरात अवकाळी पावसाने रात्री जोरदार हजेरी लावली आहे. गेले दोन दिवस अवकाळी पाऊस पडत असल्याने आंबा व काजू पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Full News

२०२४ साली नितेश राणे भाजप की नवीन पक्षातून लढणार ते आधी त्यांनी जाहीर करावे

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला टोला *💫देवगड दि.०४-:* कणकवली देवगड वैभववाडी या मतदारसंघात ३९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्ये काही गाव पॅनल देखील बिनविरोध झाली आहेत. या गाव पॅनलला बोलून भाजपचेच उमेदवार असे असेल दाखवून त्यांचे स्वागत केले जात आहे. कणकवलीत 21 पैकी 10 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले तर देवगडमध्ये शिवसेनेचे…

Read Full News

You cannot copy content of this page