बांदा दशक्रोशीत अवकाळी पाऊस

आंबा, काजूसह भात पिकाचेही मोठे नुकसान

*💫बांदा दि०५-:* सोमवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास बांदा दशक्रोशीत कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आंबा, काजू बागायतीसह उडवी करून ठेवलेल्या भात पिकाचेही नुकसान झाले. सलग दोन वर्षे प्रशासनाने नुकसान भरपाईच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान कसे भरून येणार याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. सोमवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे दोन तास पडलेल्या अवकाळी पावसात मळणीसाठी उडवी करून ठेवलेले भातपिकही भिजले. तसेच आंबा-काजू पिकांवर केलेली फवारणी पाण्यातच गेली. मंगळवारीही पूर्ण दिवस पावसाचे मळभ होते. मडुरा पंचक्रोशीत हजारो एकर जमीन आंबा-काजू बागायत लागवडीखाली येते. यावर्षी तरी काजू बागायतदारांना विमा योजनेची रक्कम मिळणार का असा सवाल काजू बागायतदारांमधून केला जात आहे.

You cannot copy content of this page