कणकवलीत पहाटे अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या

*💫कणकवली दि.०५-:* कणकवलीत मंगळवारी पहाटेपासून अवकाळी पाऊस पडला. मंगळवारी पहाटे साडेचार च्या सुमारास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कणकवली शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी बरसल्या. काजू आणि आंब्याला मोहोर येण्याच्या ऐन हंगामात पडलेल्या या पावसामुळे काजू आणि आंबा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे काजू- आंबा बागायतदार चिंतेत आहेत.

You cannot copy content of this page