२०२४ साली नितेश राणे भाजप की नवीन पक्षातून लढणार ते आधी त्यांनी जाहीर करावे

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला टोला

*💫देवगड दि.०४-:* कणकवली देवगड वैभववाडी या मतदारसंघात ३९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्ये काही गाव पॅनल देखील बिनविरोध झाली आहेत. या गाव पॅनलला बोलून भाजपचेच उमेदवार असे असेल दाखवून त्यांचे स्वागत केले जात आहे. कणकवलीत 21 पैकी 10 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले तर देवगडमध्ये शिवसेनेचे दहा ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आमदार नितेश राणे यांनी या पुढील उमेदवार हा काँग्रेसचा असेल असे विधान केले. 2024 साली नितेश राणे भाजप की नवीन पक्षातून लढणार ते आधी त्यांनी जाहीर करावे, असा टोला शिवसेना नेते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी लगावला. कॉग्रेस महाविकास आघाडीची ताकद वाढत आहे याची खात्री आमदार नितेश राणेंना असल्यामुळेचं 2024 मध्ये कॉग्रेसचा उमेदवार असणार असे वक्तव्य त्यांनी केले असावे, असेही सावंत यांनी सांगितले. देवगड शिवसेना पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. सावंत म्हणाले, 2024 मध्ये या मतदारसंघाचा आमदार महा विकास आघाडीचा असेल. यामुळे शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद वाढते हे आमच्यासाठी लक्षणीय आहे. आमचे जुने सहकारी माजी सभापती रवींद्र जोगल यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आणि आता दोन सदस्यही बिनविरोध देखील आणले. पुरळ ग्रामपंचायत देखील आमच्या ताब्यात असणार आहे येणाऱ्या दिवसात शिवसेनेचे प्राबल्य वाढेल आणि जिल्हा परिषद मध्ये त्याचे चित्र दिसेल, असे सावंत यांनी सांगितले. यावेळी शिरगाव येथील मंगेश. तावडे नंदा तावडे, शितल तावडे, यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद साटम विलास साळसकर जिल्हा परिषद सदस्य वर्षा पवार ,अमित साळगावकर, माजी सभापती रवींद्र जोगल, युवा सेनेचे निनाद देशपांडे, अनिल मुळम आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page