*💫सावंतवाडी दि.०५-:* काल ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज उमेदवारांनी मागे घेतल्या नंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणांनी संचलन केले आहे. सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकी अनुसरून मळगाव बाजारपेठेतून पोलीस त्याचप्रमाणे दंगल नियंत्रण पथक यांनी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन केले. ग्रामपंचायत च्या तालुक्यातील सर्व निवडणुका शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून पोलीस निरीक्षक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजन केले जात आहे.
निवडणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी मळगाव मध्ये पोलिसांचे संचलन…
