Headlines

Global Maharashtra Breaking News

नांदगाव दोन्ही सर्व्हीस रस्त्यांसाठी सुरू असलेले उपोषण अखेर संदेश पारकर यांच्या मध्यस्तीने मागे….!

*💫कणकवली दि.०८-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव तिठा व नांदगाव ओटव फाटा अशा ठीकाणचे सर्व्हीस रस्ते एकाच साईटने असल्याने अपघात होण्याची शक्यता असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे .यासाठी गेल्यावर्षी नांदगाव ग्रामस्थांचे आंदोलन झाले होते .मात्र एक वर्ष लोटूनही अद्याप जमिन मोजणे व निस पुरणे या पलिकडे काहीच हालचाल न झाल्याने नांदगाव शिवसनेतर्फे संबधित विभागाला पुन्हा आंदोलनाची…

Read Full News

विनय सावंत यांनी जखमी किंगफिशर पक्षाला दिले जिवदान…!

*💫मालवण दि.०८-:* आपल्या घराच्या आवारात जखमी अवस्थेत आढळलेल्या किंगफिशर पक्षाच्या पंखाला झालेल्या जखमेवर औषधोपचार करत आचरा देवूळवाडी येथील विनय सावंत यांनी त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. गुरुवारी सायंकाळी आचरा बाजारपेठ येथील आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या परीसरात घरातील मांजर शिकारीच्या प्रयत्नात असल्याचे विनय सावंत यांना दिसून आले.बारकाईने बघितल्यावर तेथे उडता येत नसलेला किंगफिशर पक्षी सावंत यांना…

Read Full News

नव्या शैक्षणिक धोरणाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे- सुरेश प्रभू….

*💫मालवण दि.०८-:* प्रत्येकांच्या आवडीनुसार अभिरुचीनुसार शिक्षण घेता आले पाहिजे यावर नव्या शैक्षणिक धोरणाचा भर आहे. उद्याचा सुजाण नागरिक घडविणे हे महत्वाचे उद्दीष्ट या नव्या शैक्षणिक धोरणाचे आहे. केवळ मुलांची गुणवत्ता सुधारण्यावर भर नाही तर त्याचबरोबर शिक्षकांची गुणवत्ता देखील सुधारली पाहिजे हा देखील विचार करण्यात आलेला आहे. म्हणून उद्याचा भारत घडविण्यासाठी नव्या शिक्षण पध्दतीची जी गरज…

Read Full News

वाहतूक पोलीस बस्त्याव पिंटो यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

*💫कणकवली दि.०८-:* जिल्हा वाहतूक शाखेतील वाहतूक पोलीस हवालदार बस्त्याव मोतेस पिंटो ( वय ५० ) यांचे हार्ट अटॅक ने दुःखद निधन झाले. फोंडाघाट येथे ऑन ड्युटी असताना महाराष्ट्र पोलीस दलाचा रेजिंग डे कार्यक्रम साजरा केल्यानंतर पिंटो यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. सहकारी कर्मचारी तातडीने त्यांना उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात आणत असतानाच वाटेतच त्यांचे…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी २० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

*💫सिंदुर्गनगरी,दि.०८-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ५८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

मडुरा पंचक्रोशीत चार तास बरसला अवकाळी पाऊस…!

*💫बांदा दि.०८-:* गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मडुरा पंचक्रोशीसह सावंतवाडी तालुक्यात गुरूवारी संध्याकाळपासून ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेला अवकाळी पाऊस रात्रभर लागला. ऐन हिवाळ्यात पावसाने एन्ट्री घेतल्याने नागरिकांची तारांबळच उडाली. अतिवृष्टीतून वाचलेले भातपिक तसेच फवारणी केलेल्या आंबा, काजू बागायतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. गुरूवारी संध्याकाळी…

Read Full News

नांदगाव दोन्ही सर्व्हीस रस्त्यांसाठी शिवसेनेतर्फे उपोषण

प्रत्यक्ष जागा ताब्यात आल्याशिवाय आपली मागणी करता येणे शक्य नाही- हायवे प्राधिकरण;एका कार्यालयातील प्रस्तावासाठी एक वर्षाचा अवधी लागतो काय ?-: राजा म्हसकर *💫कणकवली दि.०८-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव तिठा व नांदगाव ओटव फाटा अशा ठीकाणचे सर्व्हीस रस्ते एकाच साईटने असल्याने अपघात होण्याची शक्यता असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे .यासाठी गेल्यावर्षी नांदगाव ग्रामस्थांचे आंदोलन झाले होते…

Read Full News

सुसाट धावणाऱ्या डंपरांना वेळीच रोखा!

मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी *💫बांदा दि.०८-:* बांदा-शिरोडा मार्गावरून दांडेली-पाडलोस-मडुरा मार्गे शेर्ले धावणाऱ्या मायनिंग वाहतूक करणारे रिकामी डंपर बेदरकार धावत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने याची दखल घेत कोणताही अनर्थ घडण्यापूर्वीच वाहतूक थांबवावी अन्यथा वाहतूक पूर्णपणे रोखण्यात येईल, असा इशारा मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला आहे. मुळातच बांदा-शिरोडा मार्गावरील न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा व शेर्ले…

Read Full News

नगरपालिकेच्या सभागृहाचा अवमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर कायदेशीर कारवाई करा…

*राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी* *💫सावंतवाडी दि.०८-:* सावंतवाडी शहराचा कारभार ज्या नगरपालिकेच्या लोकमान्य सभागृहातून चालवला जातो. त्या सभागृहात भाजपचे पदाधिकारी पक्षाचे कार्यालय असल्याप्रमाणे पत्रकार परिषद किंवा पक्ष प्रवेश यासारखे कार्यक्रम घेऊन सभागृहाचा अवमान करत असून, शहरातील वातावरण बिघडवण्याचे काम करत असल्याचा आरोप सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी…

Read Full News

मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा आज जत्रोत्सव…

*💫सावंतवाडी दि०८-:* मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून साजरा होत आहे. सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला मळगाव पंचायतनची तरंगकाठी व पालखी माऊलीच्या…

Read Full News

You cannot copy content of this page