मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा आज जत्रोत्सव…

*💫सावंतवाडी दि०८-:* मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून साजरा होत आहे. सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला मळगाव पंचायतनची तरंगकाठी व पालखी माऊलीच्या भेटीसाठी जाते. तर दोन दोन पूर्वसच्या जत्रोत्सवादिवशी श्री देवी माऊली देवाच्या भेटीसाठी येते. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवादिवशी काही कारणास्तव कोणाची माऊलीची ओटी भरणे राहीले असेल तर दोन पूर्वस जत्रोत्सवादिवशी श्री देवी माऊलीची ओटी भरून नवसफेड केली जाते. अशा या दोन गावचे दैवत असलेल्या श्री देव दोन पूर्वस देवाचा जत्रोत्सव आज साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी श्री देवी माऊलीचे वाजगाजत आगमन, त्यानंतर श्री देवी माऊलीची ओटी भरणे, सायंकाळपासून दोन पूर्वस देवाला केळी नारळ ठेवणे, आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री भव्य पालखी मिरवणूक व त्यानंतर खानोलकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page