नगरपालिकेच्या सभागृहाचा अवमान करणाऱ्या भाजप नेत्यांवर कायदेशीर कारवाई करा…

*राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी*

*💫सावंतवाडी दि.०८-:* सावंतवाडी शहराचा कारभार ज्या नगरपालिकेच्या लोकमान्य सभागृहातून चालवला जातो. त्या सभागृहात भाजपचे पदाधिकारी पक्षाचे कार्यालय असल्याप्रमाणे पत्रकार परिषद किंवा पक्ष प्रवेश यासारखे कार्यक्रम घेऊन सभागृहाचा अवमान करत असून, शहरातील वातावरण बिघडवण्याचे काम करत असल्याचा आरोप सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला असून, हे प्रकार त्वरित थांबवण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित प्रकारचा अहवाल देऊन कायदेशीर कारवाई करावी आणि सभागृहाचे पावित्र राखावे अशी मागणी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page