वाहतूक पोलीस बस्त्याव पिंटो यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

*💫कणकवली दि.०८-:* जिल्हा वाहतूक शाखेतील वाहतूक पोलीस हवालदार बस्त्याव मोतेस पिंटो ( वय ५० ) यांचे हार्ट अटॅक ने दुःखद निधन झाले. फोंडाघाट येथे ऑन ड्युटी असताना महाराष्ट्र पोलीस दलाचा रेजिंग डे कार्यक्रम साजरा केल्यानंतर पिंटो यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. सहकारी कर्मचारी तातडीने त्यांना उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात आणत असतानाच वाटेतच त्यांचे निधन झाले. मूळ घोणसरी ( टेंबवाडी ) येथील बस्त्याव पिंटो हे काही वर्षांपूर्वी वरवडे – फणसनगर येथे स्थायीक झाले होते.बस्त्याव पिंटो हे हॉकीपटू म्हणून पोलीस दलात सुपरिचित होते. सर्वजण त्यांना मधु या टोपणनावाने ओळखत असत.हसमुख आणि मनमिळाऊ स्वभावाच्या पिंटो यांच्या निधनाने जिल्हा पोलिस दलासह त्यांच्या मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाने वृत्त समजताच सहकारी पोलीस कर्मचारी आणि मित्रानी कणकवली येथील रुग्णालयात एकच गर्दी केली होती. पिंटो यांच्या पश्चत पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page