नांदगाव दोन्ही सर्व्हीस रस्त्यांसाठी सुरू असलेले उपोषण अखेर संदेश पारकर यांच्या मध्यस्तीने मागे….!

*💫कणकवली दि.०८-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव तिठा व नांदगाव ओटव फाटा अशा ठीकाणचे सर्व्हीस रस्ते एकाच साईटने असल्याने अपघात होण्याची शक्यता असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे .यासाठी गेल्यावर्षी नांदगाव ग्रामस्थांचे आंदोलन झाले होते .मात्र एक वर्ष लोटूनही अद्याप जमिन मोजणे व निस पुरणे या पलिकडे काहीच हालचाल न झाल्याने नांदगाव शिवसनेतर्फे संबधित विभागाला पुन्हा आंदोलनाची नोटीस बजावण्यात आली होती .यावर कोणत्याही प्रकारे चर्चा न झाल्याने घोषीत केलेले शिवसेनेतर्फे उपोषण सुरू झाले आहे होते मात्र दुपार नंतर शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या यशस्वी मध्यस्तीनंतर उपोषण सोडण्यात आले .संदेश पारकर यांनी हायवे प्राधिकरण ,भुसंपादन ,नांदगाव ग्रामस्थ ,यांची प्रांताधिकारी यांच्या सोबत संयुक्तीक चर्चा घडवून आणून यातून मार्ग काढयाचे ठरविण्यात आल्याने आजचे उपोषण मागे घेण्यात आले यावेळी त्यांच्या सोबत संदेश पटेल ,तालूका प्रमुख शैलेश भोगले तसेच नांदगाव शाखा प्रमुख राजा म्हसकर,ग्रा.पं.सदस्य अरूण बापार्डेकर ,अब्दुल नावलेकर , बाळा मोरये , गणेश बांदिवडेकर,श्रीकांत नार्वेकर ,बाळा सातोसे ,गवस साठविलकर ,शमिर नावलेकर , तसेच राष्ट्रवादीचे रज्जाक बटवाले यांनी तर काँग्रेस ,राष्ट्रवादी यांनीही उपस्थीत राहून पाठींबा दर्शविला . याबाबत अधिक वृत्त असे की, कणकवली तालूक्यातील नांदगाव येथे मुंबई गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्यात असले तरी अजून बॉक्स वेलच्या सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे .नांदगाव तिठा ,नांदगाव ओटव फाटा अशा ठीकाणच्या सर्व्हीस रस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे . सर्व्हीस रस्त्यांच्या मागणीसाठी मागील वर्षी ७ मार्च २०२० रोजी ग्रामस्थांच्या वतीने मोठया प्रमाणात आंदोलन केले होते .मात्र जादा जागेच्या संपादनासाठी मोजणी करून निस पुरण्यात येण्यापलीकडे काहीच हालचाल दिसत नाही .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रक्रीया थांबली होती . येथे जमिन मालकांचे म्हणने की, जादा जागा संपादनाचा आम्हाला मोबदला द्या आणि सर्व्हीस रस्त्याचे काम सुरू करा .आता पाऊसही गेलेला आहे .तेव्हा हे सर्व्हीस रस्ते होणार कधी ? असा प्रश्न सामान्य नागरीकांना पडला असून एकाच सर्व्हीस रस्त्याने दोन्ही कडील वाहतूक सुरू असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता आहे .तरी याबाबत आपण लक्ष देवून प्रश्न सोडवावा अशी मागणी आहे .तसेच एकाच सर्व्हीस रस्त्याने सर्व वाहतूक होत असल्याने त्यात मुख्य मुंबई गोवा वाहतूकही पुलाचे काम पूर्ण नसल्याने सुरू आहे .यामुळे पर्णनत: नांदगाव तिठा परिसरात धुळीचे साम्राज्य पसरून आरोग्यास हानिकारक झालेले आहे .याबाबत नांदगाव येथील शिवसेनेने लक्ष वेधून 15 दिवसाची मुदत देण्यात आली होती परंतू काहीच कार्यवाही न झाल्याने आज सकाळ पासून उपोषणाला सुरूवात झाली आहे. उपोषण सुरू झाल्यानंतर दोन तासा नंतर खारेपाटण येथील हायवेप्राधिकरणचे अधिकारी अधिकारी वर्ग येवून आपले लेखी म्हणने दिले मात्र यास पत्राने त्यांचे समाधान झाले नसल्याने उपोषण सुरू ठवेण्यात आले आहे . त्यांनी दिलेल्या पत्रात म्हणतात की, भुसंपादन क्षेत्र कमी पडल्याने ते काम अपूर्ण अवस्थेत आहे.या कामी मागील आंदोलनानंतर जागेची मोजणी करून निस पुरण्यात आलेले आहेत जादा जागेच्या भुसंपादनासाठी प्रस्ताव टाकलेला असून भुमीअभिलेख कडून पुढील आवश्यक कार्यवाही ही भुसंपादन प्राधिकारी यांचे मार्फत प्रगतीत आहे .सदर अतिरीक्त जागेचे भुसंपादन मिळताच सदर अपूर्ण रस्ता काम पूर्ण करण्यात येईल .प्रत्यक्ष जागा ताब्यात आल्याशिवाय आपली सदर मागणी करता येणे शक्य नाही ताबा मिळताच आठ ते दहा दिवसात सर्व्हीस रस्त्यांचे काम करण्यात येइल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे .परंतू यावर आंदोलकांचे समाधन न झाल्याने उपोषण सुरूच होते. मात्र दुपार नंतर शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या यशस्वी मध्यस्तीनंतर उपोषण सोडण्यात आले .संदेश पारकर यांनी हायवे प्राधिकरण ,भुसंपादन ,नांदगाव ग्रामस्थ ,यांची प्रांताधिकारी यांच्या सोबत संयुक्तीक चर्चा घडवून आणून यातून मार्ग काढयाचे ठरविण्यात आल्याने आजचे उपोषण मागे घेण्यात आले याबाबत शाखा प्रमुख राजा म्हसकर यांना विचारले असता ते म्हणाले की, गेल्या वर्षीच्या आंदोलनावेळी हेच उत्‍तर आताही हेच एका कार्यालयातील प्रस्तावासाठी एक वर्षाचा अवधी लागतो काय ?येथे उलटया सर्व्हीस रस्त्याने वाहने येवून अपघात घडल्यास याला जबाबदार कोण अपघातत फक्त जाणा-याचा जीव जातो याला अशा निष्काळजी पणे काम करण्या-या अधिकारी वर्गाला काही देणे घेणे नाही .त्यामुळे आम्ही या उत्तराने समाधानी नसून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे .

You cannot copy content of this page