Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी १ व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ५८९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १ व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read Full News

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचे “ते” आंदोलन ६१ व्या दिवशीही सुरूच

*💫सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्हा परिषदेचे आर्थिक सल्लागार, शोषित पीडित समाज कल्याणाचे कागदावरचे उध्दारकर्ते तीन पदांचे सोयरे वित्त विभागाचे कॅफो मदन मोहन भिसे आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांच्या रजा कालावधी तील औट घटकेचे पदोन्नती समितीचे अध्यक्ष राजेंद्र पराडकर यांनी आमच्या आंदोलकांनाचा विपर्यास वर्तमान पत्रातून प्रसिद्ध करून नवबौद्धांसह सर्व वाचकांची दिशाभूल केली…

Read Full News

शहरात इतरत्र मासे विक्रीस बसणाऱ्यावर कारवाई करा

नगरसेवक मनोज नाईक यांची मागणी *💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी शहरात सद्य स्थितीत सर्वत्र मासे विक्रेते बसत असल्याने मच्छी मार्केट मध्ये मासे विक्रेते बसत नाही आहेत. मच्छी मार्केट व्यतिरिक्त इतरत्र बसणाऱ्या मासे विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सभागृहात नगरसेवक मनोज नाईक यांनी केली आहे.

Read Full News

कळणे-सडा येथे कार अपघात

सुदैवाने जीवितहानी नाही *💫दोडामार्ग दि.११सुमित दळवी-:* दोडामार्ग च्या दिशेने जाणाऱ्या कारला समोरून येण्याऱ्या डंपरने हुल दिल्याने झाल्याने गाडीतील वृद्धेसह दोघेजण जखमी झाले.हा अपघात कळणे सडा येथील अवघड वळणांवर झाला.सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना टळली. याबाबत अधिक माहिती अशी की,कुडाळ येथील कुटुंबीय तिलारी येथे आपल्या कारमधून(एम.एच.०७ एजी २३९०) जात होते.कळणे सडा येथील अवघड वळणावर ही कार…

Read Full News

भाजपचा ट्रॅक्टर मोर्चा की कॉन्ट्रॅक्टर मोर्चा…?

आमदार नितेश राणे यांनी ट्रॅक्टर चालवत केली नोटंकी;शिवसेना नेते अतुल रावराणे यांची आमदार नितेश राणे यांच्यावर टीका *💫कणकवली दि.११-:* भाजपाचा ट्रॅक्टर मोर्चा होता की कॉन्ट्रॅक्टर मोर्चा ? परदेशात शिकलेल्या आमदार नितेश राणेंना शेतीतील काय कळते ? असा खडा सवाल करत नितेश राणे यांनी ट्रॅक्टर चालवत रोड शो ची नौटंकी केल्याची टीका शिवसेना नेते अतुल रावराणे…

Read Full News

त्या प्रकरणाशी नगरपालिकेचा संबंध नाही…

*नगराध्यक्ष संजू परब यांचे सभागृहात स्पष्टीकरण *💫सावंतवाडी दि.११-:* शहरात दोन दिवसापूर्वी शिल्पग्राम मध्ये झालेल्या प्रकारावर सभागृहात दोन्ही गटात वादळी चर्चा झाली. यावेळी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी संबंधित प्रकल्पात नगरपालिकेने हस्तक्षेप करण्याचे मत मांडले होते. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी संबंधित प्रकल्प हा ३० वर्षासाठी त्यांच्या ताब्यात असून, यावर नगरपालिकेची मदत मागितल्याशिवाय यात हस्तक्षेप करू…

Read Full News

प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण संस्थेला जागा देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात सभागृहाची एकमुखाने संमती

*💫सावंतवाडी दि.११ विनय वाडकर-:* शहरात प्राथमिक स्वरूपात सैनिकी प्रशिक्षण संस्थेला ३० वर्षासाठी जागा देण्यासाठी सरकारची परवानगी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यासाठी सभागृहात दोन्ही गटांनी एकमुखाने संमती देण्यात आली आहे. याच बरोबर तात्पुरत्या स्वरूपात १० वर्षासाठी तरी जागा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील प्रस्ताव पाठवण्यासाठी संपूर्ण सभागृहाने संमती दर्शवली आहे.

Read Full News

कोरोना काळात गावात येण्यास मज्जाव करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत जागा दाखवून द्या

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे मुंबईकर चाकरमान्यांना आवाहन* *💫कणकवली दि.११-:* कोरोणाच्या कालावधीत मुंबईवरून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना गावात येण्यास मज्जाव करणारे, तसेच गणेशोत्सव कालावधीतही चाकरमान्यांनावर दबाव आणणाऱ्या गाव पातळीवरील प्रस्थापितांना योग्य जागा दाखवण्याची हीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अशा प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे….

Read Full News

*खा. राऊत यांचा कणकवली नगरसेवक सुशांत नाईक यांच्या हस्ते सत्कार

संसदेत टॉप २५ मध्ये मानाचे स्थान मिळाल्याने करण्यात आला सत्कार *💫कणकवली दि.११-:* संसदेतील टॉप २५ खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांना मानाचे स्थान मिळाल्यामुळे कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने नगरसेवक सुशांत नाईक यांच्या हस्ते खासदार राऊत यांचा सत्कार करण्यात आला. संसदेत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून जनतेच्या समस्या मार्गी लावण्यात अग्रेसर असलेल्या २५ खासदारांमध्ये खासदार…

Read Full News

पडीक जमिनीत शास्त्रीय पद्धतीने कडधान्याचे उत्पन्न घ्या

सावंतवाडी उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे;शेर्ले, कास, पाडलोसमध्ये आदर्श कडधान्य पिक प्रात्यक्षिकाची पाहणी *💫बांदा दि.११-:* पारंपरिक पद्धतीने घेतले जाणारे कडधान्य पिकांचे उत्पादन मर्यादित असते. शास्त्रीय पद्धतीने अंतरात पेरणी, बिजप्रक्रिया, विद्राव्य खते व किटकनाशकाचा वापर केल्यास उत्पादना फरक पडतो. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पडीक जमीन न ठेवता एकत्रीत येऊन शास्त्रीय पद्धतीने कडधान्याचे उत्पन्न घेण्याचे आवाहन, सावंतवाडी…

Read Full News

You cannot copy content of this page