संसदेत टॉप २५ मध्ये मानाचे स्थान मिळाल्याने करण्यात आला सत्कार
*💫कणकवली दि.११-:* संसदेतील टॉप २५ खासदारांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांना मानाचे स्थान मिळाल्यामुळे कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने नगरसेवक सुशांत नाईक यांच्या हस्ते खासदार राऊत यांचा सत्कार करण्यात आला. संसदेत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून जनतेच्या समस्या मार्गी लावण्यात अग्रेसर असलेल्या २५ खासदारांमध्ये खासदार विनायक राऊत यांचा समावेश आहे. देशातील अग्रेसर २५ खासदारांमध्ये राऊत यांचा समावेश झाल्याबद्दल कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने खासदार राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, शहरप्रमुख शेखर राणे,प्रसाद अंधारी, सुजित जाधव, विलास कोरगावकर, तेजस राणे, साक्षी आमडोसकर, राजू राठोड आदी उपस्थित होते.
