कोरोना काळात गावात येण्यास मज्जाव करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत जागा दाखवून द्या

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे मुंबईकर चाकरमान्यांना आवाहन*

*💫कणकवली दि.११-:* कोरोणाच्या कालावधीत मुंबईवरून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना गावात येण्यास मज्जाव करणारे, तसेच गणेशोत्सव कालावधीतही चाकरमान्यांनावर दबाव आणणाऱ्या गाव पातळीवरील प्रस्थापितांना योग्य जागा दाखवण्याची हीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अशा प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे. मनसेने कोरोना काळात सातत्याने चाकरमान्यांची बाजू घेतली. गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांना सात दिवसाचे क्वारंटाईन करा, त्यांची रॅपिड चाचणी करून त्यांना गावात प्रवेश द्या, असे आवाहन सर्वप्रथम मनसेनेच केले होते. मात्र, गावी आलेल्या चाकरमान्यांना त्रास देण्याचे काम त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम तत्कालीन सरपंच, गाव पुढारी यांनी करून या चाकरमान्यांना गावी येण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. गणेशोत्सव कालावधीत तर अनेक चाकरमान्यांना गावागावांमध्ये मज्जाव करण्यात आल्याने त्यांना मुंबईतच गणेशोत्सव साजरा करावा लागला. तसे पाहायला गेल्यास कोकणात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चाकरमानी मोठ्या भक्तिभावाने हा सण साजरा करण्यासाठी गावी येत असतो. मात्र या आक्रमणाला गावात येण्यास विरोध करण्याचे काम प्रस्थापित राजकारण्यांनी केले. त्यामुळे या प्रस्थापितांना जागा दाखवण्याची हीच वेळ आहे. गणेशोत्सव कालावधीसाठी शासनाकडून चाकरमान्यांकरिता निकष निर्धारित करणे अगोदरच सरपंच संघटनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर नियमावली तयार करून चाकरमान्यांना आडकाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चाकरमान्यांची व नातेवाईकांची मन कलुषित करण्याचा हा प्रयत्न होता. अशावेळी चाकरमान्यांनी गावी येण्यासाठी मनसेने सर्वप्रथम आवाहन केले. आज मनसेने काही ठराविक उमेदवार उभे केले असले तरी ग्रामपंचायतींच्या कारभारावर लक्ष आणि नियंत्रण ठेवण्याचे काम म्हणजे करणार आहे. त्यामुळे मतदारांनी या प्रस्तावित यांना त्यांची जागा दाखवून देत मनसेच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहनही श्री. उपरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page