भाजपचा ट्रॅक्टर मोर्चा की कॉन्ट्रॅक्टर मोर्चा…?

आमदार नितेश राणे यांनी ट्रॅक्टर चालवत केली नोटंकी;शिवसेना नेते अतुल रावराणे यांची आमदार नितेश राणे यांच्यावर टीका

*💫कणकवली दि.११-:* भाजपाचा ट्रॅक्टर मोर्चा होता की कॉन्ट्रॅक्टर मोर्चा ? परदेशात शिकलेल्या आमदार नितेश राणेंना शेतीतील काय कळते ? असा खडा सवाल करत नितेश राणे यांनी ट्रॅक्टर चालवत रोड शो ची नौटंकी केल्याची टीका शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केली. कणकवली येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उदघाटन पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रावराणे बोलत होते. मुंबई शाखेच्या धर्तीवर कणकवलीतील शिवसेना संपर्क कार्यालय हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारे केंद्र बनावे अशी अपेक्षाही रावराणे यांनी व्यक्त केली. भाजपाने काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीचा आणि टीकेचा समाचार यावेळी अतुल रावराणे यांनी घेतला. ट्रॅक्टर मोर्चात शेतकरी नव्हे तर कॉन्ट्रॅक्टर चा भरणा होता. हा ट्रॅक्टर मोर्चा की कॉन्ट्रॅक्टर मोर्चा असा सवाल रावराणे यांनी केला. परदेशात शिकलेल्या नितेश राणेंना शेतकऱ्यांचे दुःख कसे समजणार ? शेतीतले त्यांना काय कळते ? असा खोचक सवालही रावराणे यांनी उपस्थित केला. ईडीचा ससेमिरा चुकवण्यासाठी आणि आपल्या खाजगी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी राणेंनी भाजपाचा आसरा घेतला. स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून जे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीत ते इतरांना पक्षप्रवेश काय देणार ? आधी भाजपात किती दिवस राहणार हे जाहीर करा असे खुले आव्हानही रावराणे यांनी राणेंना दिले.

You cannot copy content of this page