त्या प्रकरणाशी नगरपालिकेचा संबंध नाही…

*नगराध्यक्ष संजू परब यांचे सभागृहात स्पष्टीकरण

*💫सावंतवाडी दि.११-:* शहरात दोन दिवसापूर्वी शिल्पग्राम मध्ये झालेल्या प्रकारावर सभागृहात दोन्ही गटात वादळी चर्चा झाली. यावेळी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी संबंधित प्रकल्पात नगरपालिकेने हस्तक्षेप करण्याचे मत मांडले होते. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी संबंधित प्रकल्प हा ३० वर्षासाठी त्यांच्या ताब्यात असून, यावर नगरपालिकेची मदत मागितल्याशिवाय यात हस्तक्षेप करू शकत नाही. तसेच तेथे घडणाऱ्या घटणाना सर्वस्वी तो प्रकल्प ज्याच्या ताब्यात आहे. तेच जबाबदार राहतील असे स्पष्टीकरण दिले आहे.

You cannot copy content of this page