Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीत तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०९-: स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व सावंतवाडी नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रा. मिलिंद द. भोसले स्मृतीप्रीत्यर्थ ”आपण व्यक्त होऊया!” समितीकडून तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते दुसरीसाठी रंगभरण तर इ. तिसरी व चौथीसाठी चित्रकला स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. रविवार १५…

Read Full News

वैभववाडी पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा…

सभापतीपदी सिद्धेश रावराणे, उपसभापतीपदी साची कोलते बिनविरोध.. ⚡वैभववाडी ता.०९-: वैभववाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे सिद्धेश दिलीप रावराणे तर उपसभापतीपदी भाजपाच्या सौ. साची सचिन कोलते यांची बिनविरोध निवड झाली आहे.दोन्ही पदांसाठी अन्य कोणतेही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.निवड जाहीर होताच विविध राजकीय, सामाजिक…

Read Full News

देवगड सभापतीपदी भाजपाचे गणेश राणे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल लोके यांची बिनविरोध निवड…

⚡देवगड ता.०९-: प्रशासकीय राजवटीच्या चार वर्षाच्या कालखंडानंतन देवगड पंचायत समितीवर लोकप्रतिनिधी राज आले असून तब्बल चार वर्षानंतर देवगड पंचायत समितीच्या कारभारावर सभापती व उपसभापती विराजमान झाले आहेत.सोमवारी झालेल्या निवडीमध्ये सभापतीपदी भाजपाचे गणेश राणे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल लोके यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेली चार वर्षे पंचायत समितीवर प्रशासकीय राजवट होती.गटविकास अधिकारी हे प्रशासकीय कारभार…

Read Full News

जामसंडे आझादनगर येथे रिक्षा पलटी ; चालकासह चार जण गंभीर जखमी…

निरोम मधलीवाडीतील महिलांसह लहान मुलगी जखमी; मायलेक सुदैवाने बचावले ⚡देवगड ता.०९-: जामसंडे आझादनगर येथील एका अवघड वळणावर रिक्षा पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात निरोम येथील दोन महिलांसह एकूण चारजण गंभीर जखमी झाले आहेत. तेजस प्रकाश नारकर (३५, निरोम मधलीवाडी), मनोरमा रमेश राऊत (६५), नयना नामदेव राऊत (५३), आर्या सचिन राऊत (१२, सर्व रा. निरोम मधलीवाडी)…

Read Full News

दोडामार्ग पंचायत समितीत गवस यांचे वर्चस्व…

सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस.. ⚡दोडामार्ग ता.०९-: दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी पार्वती महादेव गवस यांची तर उपसभापतीपदी गणेशप्रसाद शंकर गवस यांची बिनविरोध निवड झाली. विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. कोणतीही विरोधी उमेदवारी न आल्याने दोन्ही पदांवर बिनविरोध निवड निश्चित झाली.निवड जाहीर होताच दोघांनीही पदभार स्वीकारला. तालुक्यातील राजकीय वर्तुळात समाधानाचे वातावरण निर्माण झाले…

Read Full News

संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त दोडामार्गात उद्देशिका कोरीव दगडावर बसवण्याची मागणी…

⚡दोडामार्ग ता.०९-: भारतीय संविधानाच्या गौरवशाली ७५ व्या वर्षानिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी दोडामार्ग चौकात भारतीय संविधानाची उद्देशिका (Preamble) कोरीव दगडावर कायमस्वरूपी बसवण्यात यावी, अशी मागणी समाज जागृती मंच, दोडामार्गच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात तहसीलदार तसेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. दोडामार्ग येथील तहसील कार्यालयासमोर तसेच तालुक्यातील प्रमुख शासकीय कार्यालये आणि मुख्य…

Read Full News

नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ व भरघोस नुकसान भरपाई द्या…

माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी;मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद.. ⚡कुडाळ ता.०९-: हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ व भरघोस नुकसान…

Read Full News

भंडारी हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

⚡मालवण ता.०९-:समाजात स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी अगोदर स्त्री आणि पुरुष ही नाती सक्षम बनली पाहिजेत त्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी डोळसपणे प्रयत्न केले तरच जागतिक महिला दिन साजरा केल्याचे सार्थक ठरेल, असे प्रतिपादन मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे यांनी येथे बोलताना केले मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज…

Read Full News

सन्मान, प्रेरणा अन्‌‍ कौतुकभरल्या वातावरणात झाराप मधे महिला दिन साजरा…

⚡कुडाळ ता.०९-: आपण फक्त अर्धांगिनी नाही, तर आपणच झाराप गावाच्या भाग्यविधाता आहात.”चला, एकत्र येऊन आपल्या गावाला आणि पर्यायाने देशाला विकासाच्या दिशेने नेऊया.असे प्रतिपादन सरपंच दक्षता मेस्त्री यांनी केले. जागतिक महिलादिना निम्मित झाराप ग्रामपंचायत सभागृहात  काल रविवारी महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून सरपंच दक्षता मेस्त्री बोलत होत्या.यावेळी व्यासपिठावर जिल्हापरिषद सदस्य रुपेश कानडे, पंचायत…

Read Full News

झारापमध्ये आत्मा अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद ; सेंद्रिय शेतीचा संदेश..

कुडाळ : सेंद्रिय शेती ही खर्चिक नसून किफायतशीर आणि पर्यावरणपूरक शेती पद्धत आहे. आंबा-काजू बागायतदारांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिल्यास शेतीचा खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होईल. तसेच भात शेतीतील तांदूळ उकडा तांदूळ करून विकल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो, असे मार्गदर्शन छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रसाद ओगले यांनी केले.झाराप ग्रामपंचायत सभागृहात ‘आत्मा’ अंतर्गत आयोजित…

Read Full News

You cannot copy content of this page