सन्मान, प्रेरणा अन्‌‍ कौतुकभरल्या वातावरणात झाराप मधे महिला दिन साजरा…

⚡कुडाळ ता.०९-: आपण फक्त अर्धांगिनी नाही, तर आपणच झाराप गावाच्या भाग्यविधाता आहात.”चला, एकत्र येऊन आपल्या गावाला आणि पर्यायाने देशाला विकासाच्या दिशेने नेऊया.असे प्रतिपादन सरपंच दक्षता मेस्त्री यांनी केले. जागतिक महिलादिना निम्मित झाराप ग्रामपंचायत सभागृहात  काल रविवारी महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून सरपंच दक्षता मेस्त्री बोलत होत्या.
यावेळी व्यासपिठावर जिल्हापरिषद सदस्य रुपेश कानडे, पंचायत समिती सदस्य जिजा तेली,उपसरपंच मंगेश गावकर, ग्रामपंचायत सदस्य आशपाक कुडाळकर, तनया मांजरेकर,संजीवनी पेंडूरकर,अमृता हरमलकर,विशाखा.गोडे, माजी सरपंच प्रभाकर मेस्त्री,ग्रामसेवक सतीश साळगावकर,गंगाराम वेंगुर्लेकर, कृषीविज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.प्रसाद ओगले,भगीरथ प्रतिष्ठान चे डॉ.प्रसाद देवधर,मंडळ कृषी अधिकारी गायत्री तेली, उपकृषी अधिकारी मंदार सरंबळकर, कृषीसहायक जागृती शेट्ये कुरतरकर, आत्मासमितीचे अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य तेडोली मंगेश प्रभू,आत्मा सदस्य शंकर हरमलकर,मंडळ अधिकारी उत्तरा जांभवडेकर, तलाठी सुषमा गायकवाड, पोलीस पाटील शमिका हरमलकर,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी उत्तरा जांभवडेकर, झाराप गावच्या तलाठी सुषमा गायकवाड, कृषी सहायक जागृती शेट्ये,कुडतरकर,पोलीस पाटील शमिका हरमलकर,कोतवाल पोर्णिमा कुडाळकर, पत्रकार वैशाली खानोलकर व गावातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य सेविका उद्योजिका व्यवसायिक भाजी विक्रेत्या महिला, शेतकरी महिला यांचा सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी मार्गदर्शन करताना महिला दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून महिलांच्या हक्कांचा आणि प्रतिष्ठेचा वर्षभर सन्मान करण्याचा संदेश देणारा दिवस आहे.असे म्हणले, पंचायत समिती सदस्य सीताराम तेली यांनीही महिलाना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश साळगावकर यांनी केले, तर आभार ग्रामसेवक गंगाराम वेंगुर्लेकर यांनी मानले. दरम्यान महिला दिनानिम्मित मतदानाचा हक्क बजावणाऱ्या 101 वर्षाच्या आजी लीलावती हरमलकर यांचा दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page