वैभववाडी पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा…

सभापतीपदी सिद्धेश रावराणे, उपसभापतीपदी साची कोलते बिनविरोध..

⚡वैभववाडी ता.०९-: वैभववाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे सिद्धेश दिलीप रावराणे तर उपसभापतीपदी भाजपाच्या सौ. साची सचिन कोलते यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दोन्ही पदांसाठी अन्य कोणतेही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवड जाहीर होताच विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या पुढील कार्यकाळात वैभववाडी तालुक्याच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page