दोडामार्ग पंचायत समितीत गवस यांचे वर्चस्व…

सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस..

⚡दोडामार्ग ता.०९-: दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदी पार्वती महादेव गवस यांची तर उपसभापतीपदी गणेशप्रसाद शंकर गवस यांची बिनविरोध निवड झाली. विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. कोणतीही विरोधी उमेदवारी न आल्याने दोन्ही पदांवर बिनविरोध निवड निश्चित झाली.
निवड जाहीर होताच दोघांनीही पदभार स्वीकारला. तालुक्यातील राजकीय वर्तुळात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून पंचायत समितीच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या निवडीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. भाजप व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तालुक्याच्या विकासाला नवे नेतृत्व लाभल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली.

You cannot copy content of this page