Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीत सुद्धा वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद…

केवळ अत्यावश्यक सेवा सुरु *💫सावंतवाडी दि.१० प्रसन्न गोंदावळे-:* शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत राज्य शासनाने कडक संचारबंदी जाहीर करत लावलेल्या पहिल्याच मिनी लॉकडाऊनच्या आज पहिल्याच शनिवारी सावंतवाडी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. शहरी भागात पोलीस येणारी…

Read Full News

दोडामार्गमध्ये शासनाच्या आदेशाचे पालन…

बाजारपेठे पूर्ण बंद:नागरिकांचा चांगला प्रतिसाद *💫दोडामार्ग दि.१०सुमित दळवी-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या व जिल्हाधिकारीच्या नियमानुसार शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ व दुकाने पूर्णतः बंद ठेवण्याचा आदेश दिला.त्यानुसार आज सर्वत्र बाजारपेठ बंद दिसत आहेत.त्यामुळे नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी या नियमाचा पालन करून या मिनी लॉकडाऊन ला प्रतिसाद दिला.

Read Full News

पळून गेलेला एलईडी गुरुवारी रात्री पुन्हा मालवण बंदरात प्रगटला…

मात्र, जनरेटर, साहित्य गायब; कारवाईच्या भीतीने पळून गेल्याचे खलाशाची माहिती मालवण (प्रतिनिधी) मत्स्य विभागाने पकडलेला रत्नागिरी येथील ‘एच अताउल्ला’ हा एलईडी टॉलर आठवडाभरापूर्वी मालवण बंदरातून पळून गेला असताना गुरुवारी मध्यरात्री पुन्हा हा ट्रॉलर मालवण बंदरात प्रकट झाला. या टॉलरची पाहणी आज सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकारी व पोलिसांनी केली असता टॉलर वरील महागडा जनरेटर व काही…

Read Full News

गोव्यात नोकरीनिमित्त येणाऱ्या-जाणाऱ्या तरुणांसाठी कोणतेही बंधन नाही…

बांदा सरपंच अक्रम खान यांची माहिती *💫बांदा दि.०९-:* महाराष्ट्र शासनाने लाॅकडाऊन केले असले तरी गोव्यात नोकरीनिमित्त येणाऱ्या-जाणाऱ्या तरुणांसाठी कोणतेही बंधन घालण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांनी कामावर नेहमीप्रमाणे जावे. त्यांना येताना-जाताना कोणती अडचण होणार नाही अशी माहिती बांदा सरपंच अक्रम खान यांनी दिली. श्री खान यांनी आज सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर…

Read Full News

वैभववाडी तालुका स्तरीय ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर…

*💫वैभववाडी दि.०९-:* शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने दिनांक 8 नोव्हेंबर 2020 ते 14 नोव्हेंबर 2020 या कालावधीमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन सप्ताह साजरा करण्यात आला होता. कोविड -19 चा प्रादुर्भाव सादर कालावधीत सर्वत्र असल्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन…

Read Full News

संजय देसाई यानी आरोप सिद्ध करावे..

माजी अध्यक्षा समिधा नाईक यांचे आवाहन;सहकार्य करण्याची दिली ग्वाही जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यानी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे. त्यांनी माहिती अधिकारात माहिती मागवावी. त्यासाठी माझे त्यांना पूर्ण सहकार्य राहणार आहे. माझा कालावधी कोरोनामुळे पूर्वीचे दायित्व वितरण करण्यात गेला. नवीन कामे मला सोडता आली नाहीत, अशी माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यानी…

Read Full News

काजू दर निश्चित…

बांदा-दोडामार्ग १२५, अन्य भागांत ११५ रुपये किलोयापेक्षा कमी दर मिळत असल्यास शेती संस्थाकडे काजू घाला बँक अध्यक्ष सतीश सावंत दोडामार्ग, बांदा या भागातील शेतकऱ्यांनी काजूबी १२५ रुपये प्रति किलो दराने विक्री करावी. तसेच सावंतवाडीसह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांनी ११५ रुपये प्रति किलो दराने काजू बीची विक्री करावी. हा दर काजू बी दर निश्चित समन्वय समितीने शुक्रवारी…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज ११ कोरोना रुग्ण…

७ ग्रामीण, ४ शहरात *💫सावंतवाडी दि.०७-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ११ रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात ४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

नवबौद्ध विकासाच्या १२२ कामाना मंजूरी

३ कोटी ५ लाखांची कामे समाज कल्याण समिती सभेत निर्णय अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे योजनेअंतर्गत ३ कोटी ५ लाख निधी खर्चाच्या विविध १२२ कामांना आजचा समाज कल्याण समिती सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची सभा सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात संपन्न झाली….

Read Full News

वीक एंड लॉकडाऊन कडक…

नागरिकांनी सहकार्य करावे पालकमंत्री सामंत यांचे आवाहन वीक एंड लॉकडाऊन जनतेच्या भल्यासाठी लावण्यात आला आहे. यानिमित्त शनिवार व रविवारी आठ महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या लॉकडाऊन प्रमाणे सर्व नियम राहणार आहेत. केवळ मेडिकल सुविधा व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. त्यामुळे जनतेने याला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यानी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत…

Read Full News

You cannot copy content of this page