*💫वैभववाडी दि.०९-:* शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने दिनांक 8 नोव्हेंबर 2020 ते 14 नोव्हेंबर 2020 या कालावधीमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन सप्ताह साजरा करण्यात आला होता. कोविड -19 चा प्रादुर्भाव सादर कालावधीत सर्वत्र असल्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा तालुकास्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला असून वैभववाडी तालुक्याचा स्पर्धानिहाय निकाल पुढीलप्रमाणे भाषण स्पर्धा (इयत्ता पहिली व दुसरी) प्रथम- शौर्य चेतन बोडेकर शाळा श्री रामेश्वर विद्यामंदिर एडगाव नं1, द्वितीय- तनिष्का भानुदास बुराण शाळा हेत नं 1, तृतीय- देवेंद्र महेंद्र गोसावी शाळा लोरे मांजलकरवाडी पत्रलेखन (इयत्ता तीसरी ते पाचवी) प्रथम-श्रीकांत श्रीकृष्ण पवार शाळा खांबाळे मोहितेवाडी, द्वितीय- आरुषी सुरेश जाधव शाळा उंबर्डे मराठी, तृतीय- वृषभ विजय चौरे शाळा भुईबावडा नं 1 स्वरचित कविता वाचन( इयत्ता सहावी ते आठवी) प्रथम- तनिष्का विकास खानविलकर शाळा हेत नं1, द्वितीय- अथर्व जयवंत मोरे शाळा माधवराव पवार विद्यालय कोकिसरे, तृतीय- शुभम समीर रावराणे शाळा सांगूळवाडी नंबर 1 नाट्यछटा/ एकपात्री प्रयोग (इयत्ता सहावी ते आठवी) प्रथम- आदिती विनायक पवार केंद्रशाळा खांबाळे, द्वितीय- शुभम समीर रावराणे शाळा सांगूळवाडी नं 1 पोस्टर तयार करणे(इयत्ता नववी ते दहावी) प्रथम- सानिका सुभाष गुरव लोरे हायस्कूल निबंध लेखन (इयत्ता नववी ते दहावी) प्रथम- गुरुप्रसाद मोहन हडशी शाळा नेर्ले हायस्कूल, द्वितीय- अविष्कार अनंत पालांडे नेर्ले हायस्कूल, तृतीय- प्राप्ती रविंद्र बाणे शाळा अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी बाल साहित्य ई संमेलन (इयत्ता पहिली ते बारावी) प्रथम- प्रेम प्रदीप तांबे शाळा कोकिसरे नारकरवाडी, द्वितीय- शुभम समीर रावराणे शाळा सांगूळवाडी नं 1 या स्पर्धांमाशील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम त्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वैभववाडी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
वैभववाडी तालुका स्तरीय ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर…
