काजू दर निश्चित…

बांदा-दोडामार्ग १२५, अन्य भागांत ११५ रुपये किलोयापेक्षा कमी दर मिळत असल्यास शेती संस्थाकडे काजू घाला बँक अध्यक्ष सतीश सावंत

दोडामार्ग, बांदा या भागातील शेतकऱ्यांनी काजूबी १२५ रुपये प्रति किलो दराने विक्री करावी. तसेच सावंतवाडीसह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांनी ११५ रुपये प्रति किलो दराने काजू बीची विक्री करावी. हा दर काजू बी दर निश्चित समन्वय समितीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत निश्चित केला आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यानी दिली. यावेळी त्यांनी या दरापेक्षा कमी दराने विकू नये.असे आवाहन केले. आपल्याकडील काजू बी ची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी सोसायटयाना जिल्हा बँकेतर्फे गतवर्षीपेक्षा अर्धा टक्का कमी दराने नऊ टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दराने काजू बी विकत घेतली जात असल्यास तेथे न विकता शेती संस्थेकडे विक्री करावी, असेही आवाहन केले. यावेळी समन्वयक संदीप राणे उपस्थित होते.

You cannot copy content of this page