Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळमध्ये २१ ते २५ मार्चदरम्यान ‘सिंधुसरस मिनी सरस २०२६’ प्रदर्शन…

प्रमोद कामत:बचतगटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम, खाद्यपदार्थ, हस्तकला, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.. ⚡ओरोस ता १७-: ब्रँडेड उत्पादन घेत असलेल्या जिल्ह्यातील बचतगट समूहांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने २१ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हास्तरीय सिंधुसरस तथा मिनी सरस २०२६ प्रदर्शनाचे आयोजन कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट…

Read Full News

सावंतवाडी नवसारी येथे दोघा मित्रांमध्ये हाणामारी…

सामाजिक बांधिलकीच्या टीमने दाखल केले रुग्णालयात.. ⚡सावंतवाडी ता.१७-: नवसरणी येथे आज दुपारी तीनच्या दरम्याने दोघा मित्रांमध्ये हाणामारी झाली यामध्ये कोल्हापूर येथील एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची कल्पना पॅनर परेरा यांनी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना देताच ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्या रक्त बंबाळ झालेल्या माणसाला त्यांनी स्वतःच्या मोटरसायकलवर बसून तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले….

Read Full News

धाकोरे नंबर. १ शाळेत शिवकालीन शस्ञे प्रदर्शन उपक्रम…

⚡सावंतवाडी ता.१७-:धाकोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १ येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान कडून शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.शालेय विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी गोडी निर्माण करणे, नव्या पिढीला ऐतिहासिक दृष्ट्या सक्षम बनविणे, दुर्गसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि शिवकालीन…

Read Full News

कुणकेश्वर मंदिरात अभिषेक व देवगडमध्ये रुग्णांना फळवाटप…

देवगड मध्ये आमदार निलेश राणे वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा.. ⚡देवगड ता.१७-: शिवसेना कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त देवगड तालुक्यात धार्मिक व समाजाभिमुख अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पवित्र तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथे अभिषेक करून भक्तीमय वातावरणात प्रार्थना करण्यात आली, तर देवगड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून समाजसेवेचा उपक्रमही राबवण्यात आला. कुणकेश्वर येथे श्री देव…

Read Full News

सिंधुदुर्गात काजू खरेदीसाठी २५–३० केंद्रे सुरू होणार…

शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव देण्याचा प्रयत्न; प्रति किलो १० रुपयांपर्यंत अनुदानाची मागणी, मनिष दळवी यांची माहिती.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळावा याच्यासाठी पालकमंत्री नितेश राणे आणि सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्ह्यातील विकास सहकारी संस्था ही सगळीच यंत्रणा सातत्याने प्रयत्न करते आहे. राज्य काजू परिषदेच्या…

Read Full News

सोनुर्ली येथे शनिवारपासून सांस्कृतिक मेजवानी….

‘श्री क्षेत्र गाणगापूर’ दशावतारी नाट्य प्रयोगासह, खेळ पैठणी आणि जादूचे प्रयोगाचे खास आकर्षण.. ⚡सावंतवाडी ता.१७-:‘नवयुवक कला क्रीडा मंडळ, सोनुर्ली-पाक्याचीवाडी’ यांच्या वतीने दि. २१ आणि २२ मार्च रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शनिवार, दि. २१ मार्च रोजी रात्री ९:०० वाजता सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवेरा यांचा ‘श्री क्षेत्र…

Read Full News

कणकवलीत राष्ट्रीय महामार्गाच्या कामांतील त्रुटींवर तात्काळ दुरुस्तीची मागणी…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सावंतवाडी यांचे वेधले लक्ष.. ⚡कणकवली ता.१७-: कणकवली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग फ्लायओव्हर व सर्विस रोडवरील विविध समस्यांबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नगरपंचायत हद्दीतून सुमारे १८०० मीटर लांबीचा फ्लायओव्हर व दोन्ही…

Read Full News

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

चला कुडाळ घडवूया’ अंतर्गत उपक्रम:मंदार शिरसाट आणि लायन्स क्लब यांचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.१७-: ‘चला कुडाळ घडवूया’ उपक्रम अंतर्गत नगरसेवक मंदार शिरसाठ व लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे संपन्न झाला. रिटायर्ड जीएसटी डेप्युटी कमिशनर गणेश दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला…

Read Full News

मालवण ग्रामीण रुग्णालयात आयुष शिबीर संपन्न…

⚡मालवण ता.१७-:नॅशनल आयुष मिशन अंतर्गत आयुष कक्ष ग्रामीण रुग्णालय मालवण येथे सोमवारीआयुष शिबिर संपन्न झाले. या शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभून विविध आजारांबाबत रुग्णांची तपासणी करण्यात आली. आयुष शिबिराचे उदघाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी आयुष विभाग जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथून आयुर्वेद तज्ञ म्हणून डॉ. योगेश गोडकर व होमियोपॅथी तज्ञ…

Read Full News

जिल्ह्यातील वकील सभासदांवर केलेले सरोदेंनी आरोप पूर्णतः निराधार, खोडसाळ…

सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे प्रत्युत्तर ⚡​सावंतवाडी ता.१७-:बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सावंतवाडीत आलेल्या ॲड. असीम सरोदे यांनी सावंतवाडी बार असोसिएशन आणि जिल्ह्यातील वकील सभासदांवर केलेले आरोप पूर्णतः निराधार, खोडसाळ आणि दिशाभूल करणारे असल्याची टीका सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी केली आहे. सरोदे यांचा हा खटाटोप केवळ जिल्ह्यातील…

Read Full News

You cannot copy content of this page