Headlines

Global Maharashtra Breaking News

*पाणी नेण्यासाठी मारलेल्या चरात गवारेड्याचा पडून मृत्यू..

💫 *बांदा दि.२५-:* इन्सुली येथे तिलारी उपकालव्याचे पाणी नेण्यासाठी मारलेल्या चरात पहाटेच्या वेळी अंधारात अंदाज न आल्याने गवारेडा पडून मृत्युमुखी पडला. ही घटना माऊली मंदिराच्या परिसरात घडली आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून वनविभागाच्या माहिती दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Read Full News

मतदारसंघातील तालुक्यात वॉर्ड ठरवून लसीकरण..

आमदार दीपक केसरकर : ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली माहिती *💫सावंतवाडी दि.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती ऑनलाईन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, आरोग्य केंद्रांवर लसीकरण करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रत्येक…

Read Full News

टाईल्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला नेमळेत अपघात.

मोठ्या प्रमाणात नुकसान : चालकसह क्लिनर सुखरूप *सावंतवाडी-:* गोव्याच्या दिशेने टाईल्स घेऊन जाणारा ट्रक नेमळे गावकर कुंभारवाडी येथे पलटी झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. हा मालवाहू ट्रक रस्त्यालगत गटारात आडवा झाला मात्र चालक व क्लिनर यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र, या अपघातात गाडीचे व त्यातील टाइल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Read Full News

चौके प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटायजर फवारणी यंत्र….

मालवण शिक्षक भारती संघटनेचे सौजन्य *💫मालवण दि.२४-;* शिक्षक भारती संघटना मालवण यांच्यावतीने चौके प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटायझर फवारणी यंत्र देणगी स्वरूपात देण्यात आले. चौके आरोग्य केंद्राचे डॉ. पोळ यांच्याकडे ते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केले. यावेळी शिक्षक भारती मालवणचे उपाध्यक्ष धनाजी चव्हाण, भाग्यवंत बेहेरे, संजय जाधव, कृष्णा कालकुंद्रीकर आणि आरोग्य केंद्र कर्मचारी उपस्थित होते. चौके प्रा….

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४१ रूग्ण सापडले…

*💫सावंतवाडी दि.२४-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ४१ रुग्ण सापडले असून, शहरात ८ तर ग्रामीण भागात ३३ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

कुत्र्याच्या तावडीतून ‘टिकेल ब्ल्यू’ची सुटका..

किरण चव्हाण यांनी वाचविले प्राण : पिल्लावर पक्षीप्रेमी उदय रोगे यांनी केले उपचार *💫मालवण दि.२४-:* मालवण देऊळवाडा येथील आडारी रोडवर टिकेल ब्ल्यू या पक्षाचे पिल्लू एका कुत्र्याच्या तावडीत सापडले होते. किरण चव्हाण यांनी त्या कुत्र्याच्या तावडीतून या पिल्लाची सुटका करून त्याला पक्षीप्रेमी उदय रोगे यांच्या ताब्यात दिली. एका पंखास थोडी दुखापत झालेल्या या पिल्लावर रोगे…

Read Full News

राष्ट्रीय महामार्ग भू संपादनाबाबत जनतेच्या समस्या सोडविणार..

माजी आमदार परशुराम उपरकर : वेळप्रसंगी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा *💫कणकवली दि.२४-:* ज्यांना कोकणातील जनतेने दोन वेळा खासदार म्हणून निवडून दिल्लीत पाठवले त्या खासदार विनायक राऊत यांना कोकणातील राष्ट्रीय महामार्गाच्या भू संपादनाच्या लोकांच्या अनेक समस्या तसेच अनेक ठिकाणी रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असूनही हे लोकप्रतिनिधी आपल्या स्वार्थासाठी ठेकेदारांनी बाजू घेत असतात. म्हणून…

Read Full News

बांदा शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक पुस्तक दिन केला साजरा….

*💫बांदा दि.२४-:* जर तुमच्याकडे दोन रूपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करील तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल हा डाॅ. बाबासाहेबांचा प्रेरणादायी विचार आपल्या आॅनलाईन भाषणातून बांदा केंद्रशाळेच्या नैतिक निलेश मोरजकर याने जागतिक पुस्तक दिनी व्यक्त केला. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 293 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 8 हजार 34 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 884 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 293 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांसाठी कॉरनटाईन सक्तीचे..

नियम न पाळल्यास गुन्हे दाखल करण्याचा पालकमंत्र्याचा इशारा *💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाऱ्या चाकरमानी व अन्य लोकांसाठी चेक नाके,रेल्वे टेशन व आरोग्य विभागामार्फत कॉरंटाईन करण्याचे शिक्के मारण्यात येतील. संबंधितांनी १४ दिवसांचे पालन करावयाचे आहे. जर त्या लोकांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा पालक मंत्री उदय सामंत यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page