आमदार दीपक केसरकर : ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली माहिती
*💫सावंतवाडी दि.२४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती ऑनलाईन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, आरोग्य केंद्रांवर लसीकरण करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रत्येक तालुक्यात वॉर्ड ठरवून त्या प्रमाणे लसीकरण केले जाणार आहे. तसेच तालुक्यातील गावांची यादी करून त्या प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांना बस सेवा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे तिन्ही तालुक्यांना प्रत्येकी दोन अशा सहा ॲम्बुलन्स देखील उपलब्ध करून देण्यात येणार असून एक कार्डलोजी ॲम्बुलन्स देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच कोरोना केअर सेंटर मध्ये वाफ देण्याचे मशीन, पाणी गरम करण्याचे मशीन, ऑक्स मीटर, थर्मल गन हे देखील पुरेश्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य सेविका, आशा सेविका, इत्यादी सर्वांना पिपीई किट दिले जाणार आहे. तसेच रॅपिड टेस्ट किट साठी निधी देखील देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयांना व्हेंटिलेटर किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर जंतुनाशक फवारणीसाठी कोरोसेफ स्प्रे मशीन, बायो पॅक मशीन देखील उपलब्ध केली जाणार आहे. तसेच सरपंच याना विमा मिळावा यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच बोर्डी पुल येथील एका हॉटेल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल उद्या पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
