टाईल्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला नेमळेत अपघात.

मोठ्या प्रमाणात नुकसान : चालकसह क्लिनर सुखरूप

*सावंतवाडी-:* गोव्याच्या दिशेने टाईल्स घेऊन जाणारा ट्रक नेमळे गावकर कुंभारवाडी येथे पलटी झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. हा मालवाहू ट्रक रस्त्यालगत गटारात आडवा झाला मात्र चालक व क्लिनर यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र, या अपघातात गाडीचे व त्यातील टाइल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

You cannot copy content of this page