चौके प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटायजर फवारणी यंत्र….

मालवण शिक्षक भारती संघटनेचे सौजन्य

*💫मालवण दि.२४-;* शिक्षक भारती संघटना मालवण यांच्यावतीने चौके प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटायझर फवारणी यंत्र देणगी स्वरूपात देण्यात आले. चौके आरोग्य केंद्राचे डॉ. पोळ यांच्याकडे ते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केले. यावेळी शिक्षक भारती मालवणचे उपाध्यक्ष धनाजी चव्हाण, भाग्यवंत बेहेरे, संजय जाधव, कृष्णा कालकुंद्रीकर आणि आरोग्य केंद्र कर्मचारी उपस्थित होते. चौके प्रा. आरोग्य केंद्राकडून शिक्षक भारती संघटनेला सॅनिटायझर फवारणी यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी आवाहन करण्यात आले. या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत क्षणाचाही विलंब न करता तालुका कार्यकारिणीने उपलब्ध करून देण्याचे ठरवले आणि दुसऱ्याच दिवशी संघटनेने सॅनिटायझर मशिन देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिले. यावेळी डॉ. पोळ आणि सर्व आरोग्य कर्मचारी यांनी संघटनेचे आभार मानले. यापूर्वीही शिक्षक भारती संघटनेने मास्क व सॅनिटायझर आरोग्य केंद्राला उपलब्ध करून दिल्याचे डॉ. पोळ यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page