माजी आमदार परशुराम उपरकर : वेळप्रसंगी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा
*💫कणकवली दि.२४-:* ज्यांना कोकणातील जनतेने दोन वेळा खासदार म्हणून निवडून दिल्लीत पाठवले त्या खासदार विनायक राऊत यांना कोकणातील राष्ट्रीय महामार्गाच्या भू संपादनाच्या लोकांच्या अनेक समस्या तसेच अनेक ठिकाणी रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असूनही हे लोकप्रतिनिधी आपल्या स्वार्थासाठी ठेकेदारांनी बाजू घेत असतात. म्हणून जनतेच्या हितासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे असे मत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी प्रसिध्दीपत्रखातून व्यक्त केले आहे.
