बांदा शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक पुस्तक दिन केला साजरा….

*💫बांदा दि.२४-:* जर तुमच्याकडे दोन रूपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करील तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल हा डाॅ. बाबासाहेबांचा प्रेरणादायी विचार आपल्या आॅनलाईन भाषणातून बांदा केंद्रशाळेच्या नैतिक निलेश मोरजकर याने जागतिक पुस्तक दिनी व्यक्त केला. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे या उद्देशाने दरवर्षी जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिन युनेस्को मार्फत दरवर्षी २३ एप्रिलला जागतिक पुस्तक साजरा केला जातो. बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातूनच हा दिवस आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करून साजरा केला. यावेळी बोलताना प्राथमिक शिक्षक जे. डी .पाटील यांनी सांगितले की सध्याच्या मोबाईलच्या युगात तरुण वर्गाची पुस्तके वाचनाची सवय कमी झाली असून तरुणांनी पुस्तके वाचनाची आवड व पुस्तकांची संग्रहवृत्ती जोपासली पाहिजे असे आवाहन या दिवसाच्या निमित्ताने केले.

You cannot copy content of this page