Headlines

Global Maharashtra Breaking News

आता चुका काढण्याचे दिवस नाहीत: एकत्रित कोरोनाला हरविण्याचे दिवस

पुढील पंधरा दिवसांत कोरोनाला रोखुया;नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांचे नागरिक, सर्वपक्षियांना आवाहन *💫मालवण दि.०७-:* मालवण शहरात कोरोना संसर्ग वाढला असताना नगरपालिका आवश्यक त्या उपयोजना राबवत आहे. आज खरी गरज असताना शहरात पूर्वी सारखी खबरदारी व नियमांचे पालन होताना दिसत नाही. शहरात गेल्या चाळीस दिवसात ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता निर्णायक संगठित प्रयत्न करण्यासाठी…

Read Full News

पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात सावंतवाडीत कॉंग्रेसचे आंदोलन

मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी *💫सावंतवाडी दि.०७-:* पेट्रोल डिझेल दरवाढीचा विरोधात आज तालुका कॉंग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेल कर यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी गांधी चौक येथे मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेस शहर अध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, माजी नगरसेवक राजू मसुरकर, तालुका उपाध्यक्ष अशोक राऊळ, आनंद परुळेकर, विभावरी…

Read Full News

१६९ सरपंचांचा साडे सात लाखाचा विमा उतरविणार

कणकवली मतदार संघातील सर्वपक्षीय सरपंचांना विमा कवच:आम.नितेश राणे यांची घोषणा *💫कणकवली दि.०७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना महामारी निस्वार्थीपणे आपल्या गावातील सरपंच जीवाची पर्वा न करता लढत आहेतकोविड काळामध्ये फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या कणकवली-देवगड-वैभववाडी तालुक्यातील सर्वपक्षीय १६९ सरपंचांना मेडिकल विमा कवच देण्याची घोषणा कणकवली विधानसभा मतदार संघाचे आम.नितेश राणे यांनी केली आहे. प्रत्येक सरपंचाला साडे सात लाखापर्यंत मोफत…

Read Full News

वेत्ये येथील लाकूड व्यवसायिक गुरुनाथ गावडे यांचे अल्पशा आजाराने निधन

*💫सावंतवाडी दि.०७-:* वेत्ये येथील लाकूड व्यापारी गुरुनाथ गावडे (वय ६५) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. गेले काही दिवस त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा अचानक जाण्याने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Full News

तौक्ते वादळाने केलेल्या नुकसानीचे तपशीलवार मुल्यमापन करून भरपाई द्या

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे केंद्रीय समितीला निवेदन *💫कणकवली दि.०७-:* तौक्ते वादळाने १६ मे रोजी झालेल्या सर्व नुकसानीची पाहणी करताना व त्याचे मुल्यमापन करताना घरे,गोठे यांचे नुकसानीचे पंचनामे बाजारातील वस्तुंचे दर व दुरुस्तीसाठीची व्यावहारीक मजुरी लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे तसेच बागायती, झाडे, आंबा यासाठी मिळणारी नुकसान भरपाई लवकर संबधित बाधित व्यक्तीचे बँक खात्यात जमा…

Read Full News

वेत्ये येथील सुप्रसिध्द नाट्य पार्श्वसंगीतकार प्रसाद जोशी यांची आत्महत्या…

*💫सावंतवाडी दि.०७-:* वेत्ये येथील सुप्रसिध्द नाट्य पार्श्वसंगीतकार तथा मळगाव येथील साईप्रसाद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक प्रसाद विष्णू जोशी, (५३) यांनी सोमवारी पहाटे घरासमोरील मठात आजारपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आकस्मित निधनाने नाट्यसृष्टीसह सर्वत्र वेत्ये परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ते उत्कृष्ट पार्श्वसंगीतकार होते. सिंधुदुर्गासह गोवा, रत्नागिरी येथील जवळपास २ हजार नाटकांसाठी त्यांनी पार्श्वसंगीत दिले होते….

Read Full News

शिक्षणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करा – आ. वैभव नाईक…

*💫कुडाळ दि.०७-:* १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई, पुणे, तसेच इतर ठिकाणी शिक्षणानिमित्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून बाहेर गावी शिक्षणानिमित्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याची मागणी केली. या मागणीची दखल ना. उदय…

Read Full News

५० टक्के आसन क्षमतेने जिल्ह्यात एसटी वाहतूक सुरु

बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी *💫कणकवली दि.०७-:* कोरोना पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात नव्या नियमानुसार लॉकडॉऊनमध्ये शिथिलता करण्यात आली असून कणकवली तालुक्यातील एस. टी. सेवा ५० % आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली एस.टी स्टॅन्डवर प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. 50 आसन क्षमतेच्या एसटीत 25 प्रवाशी मिळताच सोडण्यात येणार आहे व प्रवाशांनीही एसटी प्रवास करताना…

Read Full News

…तर अल्पावधित आपला देश कोरोनामुक्त होईल: प्रा.नाटेकर

*💫कणकवली ०७-:* कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती मार्फत घरोघरी जाऊन रॅपीड टेस्ट घ्यावी . ज्या व्यक्ती कोरोना बाधित ( पॉझिटिव्ह ) सापडतील , त्यांना त्वरित औषधोपचाराने बरे करावे व अन्य व्यक्तींना अविलंब लस देऊन सुरक्षित करावे . अशा प्रकारे युध्दपातळीवर काम केल्यास अल्पावधित आपला देश कोरोनामुक्त होईल , हे ” प्रतिज्ञोत्तर ” माझे असे प्रा.महेंद्र…

Read Full News

आम.नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत राष्ट्रीय काँग्रेस तर्फे गरिबांना धान्य वाटप…

*💫वेंगुर्ले दि.०७-:* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत राष्ट्रीय काँग्रेस तर्फे गरीब लोकाना धान्य वाटप करण्यात आले. कोरोना महामारी से संकट लक्षात घेता काँग्रेसतर्फे आमदार पटोले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस वेंगुर्ले तालुकाध्यक्ष नगरसेवक विधाता सावंत, सिंधुदुर्ग काँग्रेस कार्याध्यक्ष विलास गावडे, माजी नगरसेवक मनिष परब, शैलेश करंजेकर,…

Read Full News

You cannot copy content of this page