…तर अल्पावधित आपला देश कोरोनामुक्त होईल: प्रा.नाटेकर

*💫कणकवली ०७-:* कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती मार्फत घरोघरी जाऊन रॅपीड टेस्ट घ्यावी . ज्या व्यक्ती कोरोना बाधित ( पॉझिटिव्ह ) सापडतील , त्यांना त्वरित औषधोपचाराने बरे करावे व अन्य व्यक्तींना अविलंब लस देऊन सुरक्षित करावे . अशा प्रकारे युध्दपातळीवर काम केल्यास अल्पावधित आपला देश कोरोनामुक्त होईल , हे ” प्रतिज्ञोत्तर ” माझे असे प्रा.महेंद्र नाटेकर म्हणाले . प्रा.नाटेकर पुढे म्हणाले , केवळ लॉकडाऊन करुन किंवा काही तास बाजारपेठ सुरु ठेवून कोरोनावर मात करणे केवळ अशक्य आहे.उलट त्यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार होतो.घरामध्ये एखादा पॉझिटिव्ह असला तर सर्व कुटुंबच ‘ पॉझिटिव्ह ‘ होऊन जाते.काही वेळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवली तर संपूर्ण बाजारपेठत तुफान गर्दी उसळते.त्यात गावागावातून आलेल्या पॉझिटिव्ह व्यक्ती असतात.अशा स्थितीत कोरोनाला आळा बसण्याऐवजी ‘ बुमरँग ‘ होऊन प्रसार मात्र जोरदार होतो.यासाठी दिवसभर दुकाने उघडी ठेवल्यास दुकानांसमोर अत्यल्प ग्राहक दिसतील.त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराला आळा बसेल . सर्व सांगितल्याप्रमाणे सर्व कोरोना बाधितांवर औषधोपचार केल्यावर व सर्वांना लस दिल्यावर लवकरच कोरोनाला आळा बसेल.मग पूर्ववत बाजार रहाट सुरु राहील.उद्योग – धंदे , कार्यालये , वाहतूक , दळणवळण सुरु राहून मोडकळीस आलेले अर्थचक्र दुरुस्त होऊन तमाम जनता सुखासमाधानाने जगू शकेल . ज्यांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत ते मास्क न लावताही सर्वत्र संचार करु शकतील , असे जे अमेरिकेचे प्रेसिडंट जो बायडेन यांनी म्हटले आहे.त्याची प्रचिती आपणालाही भारतात येऊ शकेल .असे .महेंद्र नाटेकर म्हणाले .

You cannot copy content of this page