५० टक्के आसन क्षमतेने जिल्ह्यात एसटी वाहतूक सुरु

बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

*💫कणकवली दि.०७-:* कोरोना पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात नव्या नियमानुसार लॉकडॉऊनमध्ये शिथिलता करण्यात आली असून कणकवली तालुक्यातील एस. टी. सेवा ५० % आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली एस.टी स्टॅन्डवर प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. 50 आसन क्षमतेच्या एसटीत 25 प्रवाशी मिळताच सोडण्यात येणार आहे व प्रवाशांनीही एसटी प्रवास करताना आपल्या चेहऱ्यावर मास्क वापरणे व सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आज कणकवली बस स्थानकातून आचरा, कळसुली, नरडवे, घोडगे ,फोंडा, खारेपाटण, वैभववाडी ,मौदे, सावंतवाडी, अशा काही एस टी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. याचे वेळापत्रक हि लावण्यात आले असून जसजसे प्रवासी उपलब्ध होतील तसतशा एस टी फेर्‍या वाढविण्यात येतील अशी माहिती सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.

You cannot copy content of this page