१६९ सरपंचांचा साडे सात लाखाचा विमा उतरविणार

कणकवली मतदार संघातील सर्वपक्षीय सरपंचांना विमा कवच:आम.नितेश राणे यांची घोषणा

*💫कणकवली दि.०७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना महामारी निस्वार्थीपणे आपल्या गावातील सरपंच जीवाची पर्वा न करता लढत आहेतकोविड काळामध्ये फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या कणकवली-देवगड-वैभववाडी तालुक्यातील सर्वपक्षीय १६९ सरपंचांना मेडिकल विमा कवच देण्याची घोषणा कणकवली विधानसभा मतदार संघाचे आम.नितेश राणे यांनी केली आहे. प्रत्येक सरपंचाला साडे सात लाखापर्यंत मोफत वैद्यकीय उपचार या मेडिकल इंशुरन्स मोफत मिळणार आहेत. चोलामंडल एम. एस. जनरल इंशुरन्स कंपनीचे मेडिकल विमा कवच देण्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली. आम.नितेश राणे यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेत सरपंचांना देण्यात येणाऱ्या विमा कवच बाबत माहिती दिली.कोविड काळामध्ये फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या सरपंचांना विमा कवच मिळावे अशी मागणी सातत्याने जिल्ह्यातील सरपंच राज्य सरकारकडे करत आहेत. सरपंचाना विमा कवच देण्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली होती. मात्र मागील सव्वा वर्षात सरपंचांना विमा कवच हे मृगजळच ठरले होते. दोन दिवसांपूर्वी आमदार नितेश राणे यांच्या पुढाकारातून हिवरे बाजार सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्याशी कोरोनामुक्त गाव ठेवण्यासाठी झालेल्या संवादात्मक मार्गदर्शन चर्चेत जिल्ह्यातील सरपंचांनी गावात कोरोना लढ्यात फ्रंटलाईन वर काम करताना किमान विमा कवच तरी द्यावे जेणेकरून बिनघोरपणे कोरोनाशी लढा देता येईल अशी खंत वजा अपेक्षा व्यक्त केली होती. मागील सव्वा वर्षांपासून सरपंचांची सुरू असलेली मागणी आमदार नितेश राणे यांनी पूर्ण करण्याची घोषणा केली असून त्याचा सर्वपक्षीय १६९ सरपंचाना लाभ मिळणार आहे. आम. नितेश राणे यांनी, कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यातील सरपंचांचे मनोबल वाढवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साडे सात लाखाचे मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी मेडिकल इंशुरन्स उतरण्याची मोठी घोषणा पत्रकार परीषदेत केली. या विमा पॉलिसी अंतर्गत प्रत्येक सरपंचाची ३ लाखाची विमा पॉलिसी उतरवली जाणार असून हा विमा एका वर्षासाठी मर्यादीत असणार आहे. मात्र एका वर्षाच्या मुदतीच्या आत तीन लाखाचे वैद्यकीय उपचार होवून आणखी वैद्यकीय खर्च वाढला तर पॉलिसी धारक सरपंचाला आणखी ७५ हजार रुपयांचं बेनिफिट दिले जाणार असून त्यापेक्षाही खर्च वाढल्यास तीन लाख रुपये अॕड आॕन केले जाणार आहेत. चोलामंडलम या कंपनीचा इन्शुरन्स उतरवला जाणार आहे भारतात ९३०० हॉस्पिटल या कंपनीची टाइप आहेत. एक देशातील दर्जेदार इन्शुरन्स कंपनी असून त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभेतील सरपंचांना होणार आहे. एकंदरीत पॉलिसीच्या एक वर्षाच्या कालावधीत साडेसात लाख रुपयांचे मोफत वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. यासोबतच लोकप्रतिनिधी असलेले सरपंच जर कामगार असतील तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये अॕडमीट असताना त्यांना प्रतिदिन ५०० रुपये डेलि कॕश बेनिफिट मिळणार आहे. आजारासंदर्भात पॉलिसीधारक सरपंचांनी कुठल्याही डॉक्टरचे सेकंड ओपिनियन घेतले तर सेकंड ओपिनियनची फी सुद्धा या पाॉलिसीतून सरपंचांना मिळणार आहे. तसेच सरपंचांना वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी अँब्युलन्ससाठी दोन हजार रुपये मिळणार आहेत. मोतीबिंदू ऑपरेशन सारख्या काही ट्रीटमेंट ह्या डे केअर मध्ये समाविष्ट असतात. पॉलिसीधारक सरपंचानी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न होता डे केअर ट्रीटमेंट घेतली तर त्याचाही खर्च या पॉलिसीतून मिळणार आहे.तसेच होमिओपॅथी,आयुर्वेदिक, युनानी या पद्धतीने उपचार घेतल्यास संबंधित डॉक्टर रजिस्ट्रेशन असेल त्याचीही बिले दिली जातील.सर्व सरपंचांची पॉलिसी उतरण्यासाठी माहिती गोळा झाल्यानंतर येत्या आठवड्याभरात प्रत्यक्ष पॉलिसी उतरण्यात येणार असल्याची माहिती आम. नितेश राणे यांनी दिली. हेल्थ इन्शुरन्स मध्ये कुठलेही राजकीय मतभेद ठेवू नयेत, कारण हा जीवन-मरणाचा प्रश्न असून सर्व आजार या हेल्थ इन्शुरन्समध्ये उपचारासाठी पात्र ठरत आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे मी कणकवली विधानसभा मतदार संघात सरपंच यांच्यासाठी विमा देणार आहे. त्यामुळे कुडाळ व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आमदारांनाही माझी विनंती आहे. सरपंचासाठी सत्तेतले आमदारानी व पालकमंत्र्यांनी विमा कवच द्यावे,असा उपरोधिक टोलाही आमदार नितेश राणे यांनी सत्ताधारी शिवसेना आमदारांना लगावला आहे. ही माझी राजकीय भूमिका नसून एक सर्वसामान्य काम करणाऱ्या माणसाला विमा द्यावा यासाठी प्रयत्न आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार यांना जिल्हा परिषदने लसीकरणाचा प्रयत्न केला. मात्र राजकीय द्वेषाने पछाडलेल्या सत्ताधाऱ्यांनी हे लसीकरण बंद करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दबाव टाकण्याचा आरोपही आमदार नितेश राणे यांनी केला.

You cannot copy content of this page