पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात सावंतवाडीत कॉंग्रेसचे आंदोलन

मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी

*💫सावंतवाडी दि.०७-:* पेट्रोल डिझेल दरवाढीचा विरोधात आज तालुका कॉंग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेल कर यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी गांधी चौक येथे मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कॉंग्रेस शहर अध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, माजी नगरसेवक राजू मसुरकर, तालुका उपाध्यक्ष अशोक राऊळ, आनंद परुळेकर, विभावरी सुकी, माया चिटणीस, विल्यम सालडाना, जास्मिन लक्ष्मेश्र्वर, उमेश मोरे, राकेश चितारी, सच्चिदानंद फुगडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page