वेत्ये येथील सुप्रसिध्द नाट्य पार्श्वसंगीतकार प्रसाद जोशी यांची आत्महत्या…

*💫सावंतवाडी दि.०७-:* वेत्ये येथील सुप्रसिध्द नाट्य पार्श्वसंगीतकार तथा मळगाव येथील साईप्रसाद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक प्रसाद विष्णू जोशी, (५३) यांनी सोमवारी पहाटे घरासमोरील मठात आजारपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आकस्मित निधनाने नाट्यसृष्टीसह सर्वत्र वेत्ये परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ते उत्कृष्ट पार्श्वसंगीतकार होते. सिंधुदुर्गासह गोवा, रत्नागिरी येथील जवळपास २ हजार नाटकांसाठी त्यांनी पार्श्वसंगीत दिले होते. याच बरोबर त्यांचा मळगाव येथे टिव्ही दुरूस्तीचा व्यवसाय असून गावच्या पुरोहिताचे कामही ते करायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page