भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे केंद्रीय समितीला निवेदन
*💫कणकवली दि.०७-:* तौक्ते वादळाने १६ मे रोजी झालेल्या सर्व नुकसानीची पाहणी करताना व त्याचे मुल्यमापन करताना घरे,गोठे यांचे नुकसानीचे पंचनामे बाजारातील वस्तुंचे दर व दुरुस्तीसाठीची व्यावहारीक मजुरी लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे तसेच बागायती, झाडे, आंबा यासाठी मिळणारी नुकसान भरपाई लवकर संबधित बाधित व्यक्तीचे बँक खात्यात जमा करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीकडे केली आहे या निवेदनात राजन तेली म्हणतात,वादळामुळे माडबागायती, हापुस आंबा कलमे,सुपारी,कोकम,फणस व इतर झाडे यांचे मोठे नुकसान झालेले आहे, तसेच झाडे पडल्याने घरे,गोठे,दुकाने,शासकीय इमारतीचेंही मोठे नुकसान झालेले आहे. या सर्व नुकसानीची पाहणी करताना व त्याचे मुल्यमापन करताना पुढील तपशिलाने विचार व्हावा. पडलेल्या माड झाडाचे मुल्यांकन करताना वर्षाला किमान २०० नारळ ×दर रु.२०=४०००/- असे पुढील ८/१० वर्षाचे उत्पन्न किमान रु.३२,०००/- नुकसान झालेले आहे. आज उभा असलेल्या माड झाडाचा विचार करताना त्या झाडावरील नारळ वाऱ्याने पडलेले, व जिवंत उभा दिसनाऱ्या माडाची सर्व झावळे व त्यावर दिसनारे सर्व नारळ फळे पुढील दोन महीन्यात पडुन जाणार आहेत. सदर माडास पुन्हा नारळाची फलधारना होण्यास किमान ७/८ महीने जातील. याचा अर्थ यावर्षी मिळणारे उत्पन्न व पुढील वर्षाचे उत्पन्न यावर परीणाम झाल्याने वार्षीक रु.४०००/- प्रमाणे रु.८०००/- नुकसान होणार आहे. हापुस आंबा कलम बागायतीचा विचार करता मे महीना अखेर २५℅ आंबा झाडावर असतो, या फळांचे वा-यामुळे नुकसान झालेले आहे. काही झाडे वा-याने मोडुन,कुपळुन पडलेली आहेत,अशी झाडे पुढील उत्पन्न देणार होती, याचा विचार व्हावा. याच जागेवर नविन कलम झाड लावणेसाठी व त्याचे उत्पन्न मिळेपर्यत संगोपन करणेसाठी शेतक-याना प्रत्येक झाडामागे किमान ५ते६ हजार रुपये खर्च होतो. तेवढी तरी किमान रक्कम प्रती झाड नुकसान भरपाई मिळावी. व पडुन गेलेल्या फळांचे पंच यादीप्रमाने नुकसान भरपाई मिळावी. सुपारी, कोकम, काजु, फणस आज उभ्या असलेल्या प्रती झाडामागे रु.१०००/- नुकसान भरपाई मिळावी. ज्या घरांवर/गोठ्यांवर वादळी वाऱ्याने झाडे पडुन नुकसान झाले आहे त्यांची पंचयादी करताना शासकीय यंत्रना वास्तवातील व्यावहारीक मुल्यांपेक्शा फारच कमी रक्कमेचे पंचनामे करीत आहेत. आता पावसाळा आला असल्याने कदाचीत तात्पुरते निवारे/दुरुस्ती करुन वापर सुरु करावा लागणार व नतंर कायम स्वरुपी दुरुस्ती करावी लागणार असल्याने दुरुस्तीचा खर्च दिडपट होणार आहे. तरी अशा घरे,गोठे यांचे नुकसानीचे पंचनामे बाजारातील वस्तुंचे दर व दुरुस्तीसाठीची व्यावहारीक मजुरी लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. व मिळणारी नुकसान भरपाई लवकर संबधित बाधित व्यक्तीचे बँक खात्यात जमा करावी अशी मागणी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे.
