Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६३ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२५ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ६३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १५ तर ग्रामीण भागात ४८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

विकासकामांत राजकरण आणि तडजोड आपण करीत नाही

पालक्कमंत्री भेटीवेळी संजू परब यांचे विधान *💫सावंतवाडी दि.२५-:* विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणि तडजोड आपण करत नाही. तसेच राजकारणात वाद विवाद असतात. त्या वादाला विकास कामात थारा नसतो असे स्पष्टीकरण आज सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी नगरपालिकेत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या भेटीवेळी केले आहे. सावंतवाडी शहरात मंजूर झालेल्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी…

Read Full News

राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य दूरगामी परिणाम करणारे

सामाजिक सुधारणांसोबतच स्वतंत्र भारताचा भक्कम पाया रचला-:श्रीराम पचिंद्रे *💫ओरोस दि.२५-:* राजर्षी शाहू महाराज हे लोकोत्तर व्यक्तीमत्व होते. समाज सुधाराणांचा वसा पुढे नेतानाच त्यांनी स्वतंत्र भारताचा भक्कम पाय निर्माण करण्याचे कार्य केले. त्यांचे हे कार्य म्हणजे दूरगामी परिणाम करणारे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक व इतिहास अभ्यासक श्रीराम पचिंद्रे यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू माहाराज यांच्या…

Read Full News

युवक कॉंग्रेसकडून मोफत मास्क व सँनिटायझर वाटप

राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिनी राबविला उपक्रम *💫वैभववाडी दि.२५-:* काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैभववाडी युवक काँग्रेस च्या वतीने काँग्रेसचे नेते अनंत पवार यांच्या सौजन्याने वैभववाडी तालुक्यातील पत्रकारांना सॅनिटायझर व मस्कचे वाटप वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महेंद्र सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Full News

मालवण आगारातून लांब पल्ल्याच्या तीन बसफेऱ्या सुरू होणार

*💫मालवण दि.२५-:* कोरोनामुळे लागू केलेल्या कडक निर्बंधांच्या लॉकडाऊनमध्ये राज्य शासनाने शिथिलता आणल्या नंतर परिवहन विभागाकडून काही एसटी बस फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण आगारातून लांब पल्याच्या तीन बस फेऱ्या दिनांक २८ जून पासून सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये मालवण – बारशी वेळ पहाटे ४:५०, मालवण – रत्नागिरी वेळ सकाळी ११:१५, मालवण…

Read Full News

विजेच्या खेळखंडोब्याने तारकर्ली ग्रामस्थ हैराण;

ठिय्या आंदोलनाचा इशारा *💫मालवण दि.२५-:* तौक्ते वादळानंतर वीज पुरवठा खंडित होऊन आठ दिवस अंधारात राहिलेल्या तारकर्ली गावातील वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतरही गेले अनेक दिवस सातत्याने वीज पुरवठ्याचा खेळ खंडोबा सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून वीज पुरवठा नियमित करण्यात वीज वितरण विभाग दुर्लक्ष करत आहे. येत्या पंधरा दिवसात तारकर्ली गावातील विजेचा…

Read Full News

मालवण ४ रोजी विद्यार्थ्यांसाठी वेबिनार

*💫मालवण दि.२५-:* मालवण तालुका बौद्ध सेवा समिती मुंबई, मुलखी शाखा यांच्यावतीने ‘चला ज्योत जागवूया’ या उपक्रमाअंगर्तत ४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांचे लॉकडाऊन संपल्यावर काय भविष्य असेल? या विषयावर डॉ. लता. सुभाष मोरे या मार्गदर्शन करणार आहेत. ऑनलाईन वेबिनार गुगल मिट व यूट्युब चॅनलवर प्रसारित…

Read Full News

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी ‘सतर्क पोलिस टाइम्स’ चे आमरण उपोषण सुरु

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मकलेश सुरु *💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ढासळलेली आरोग्य यंत्रणा आणि कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा रुग्णालयातील रिक्त असलेले जिल्हा शल्यचिकित्सक पद तसेच अन्य रिक्त पदे तात्काळ भरावीत . या मागणीसाठी “सतर्क पोलीस टाइम्स “च्या वतीने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आत्मक्‍लेश आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हात कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची वाढती संख्या…

Read Full News

आजच्या भूमिपूजनाने विकासकामांचे श्रेयवाद करणाऱ्यांना चोख उत्तर

सावंतवाडी येथे पालकमंत्री उदय सामंत यांची विरोधकांवर टिका *💫सावंतवाडी दि.२६ प्रसन्न गोंदावळे-:* गेले काही दिवस जिल्हात विकास कामांवरून श्रेयवादाच्या सुरू असलेल्या वादाला सावंतवाडी शहरातील विकास कामाच्या भुमिपूजनातून चोकप्रतिउत्तर विरोधकांना दिले असल्याची टिका पालंकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.  तसेच या पुढे देखील सावंतवाडी शहरातील विकाससाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला जाईल. शहराच्या…

Read Full News

एस. टी. लांब पल्याच्या गाड्या सुरू

मात्र गावांतील फेऱ्या अजूनही बंदच *💫कणकवली दि.२५-:* राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाने येत्या २८ जूनपासून लांब पल्याच्या ४१ फेऱ्या सुरु करण्याचे जाहीर केले आहे. मात्र परिसरातील गावांतील गाड्या सुरु न केल्याने या लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रवासी कसे उपलब्द होतील याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हातील पंघक्रोशीतील बाजारपेठांतील व्यापारी, छोटे उद्योजक, आजारी व्यक्ती, अन्य कामांसाठी…

Read Full News

You cannot copy content of this page