Headlines

एस. टी. लांब पल्याच्या गाड्या सुरू

मात्र गावांतील फेऱ्या अजूनही बंदच

*💫कणकवली दि.२५-:* राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाने येत्या २८ जूनपासून लांब पल्याच्या ४१ फेऱ्या सुरु करण्याचे जाहीर केले आहे. मात्र परिसरातील गावांतील गाड्या सुरु न केल्याने या लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रवासी कसे उपलब्द होतील याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हातील पंघक्रोशीतील बाजारपेठांतील व्यापारी, छोटे उद्योजक, आजारी व्यक्ती, अन्य कामांसाठी जाणारे आदींना मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव आदी ठिकाणी जायचे असेल तर प्रथम शहराच्या ठिकाणी यावे लागेल. तसेच गावांतील लोकांना पावसाळी, शेतीविषयक, भुसारी माल खरेदी, बँक व्यवाहर, शासकिय कामे, आजारपणासाठी डाँक्टरांकडे आदी कारणांसाठी शहरांकडे जा-ये करायची असेल तर त्यांच्या गावांतील एस. टी. फेऱ्याच बंद असल्याने ते घराबाहेर पडूच शकणार नाहीत. अशा परिस्थित एस. टी. ला प्रवासी कसे मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आधी कोंबडी की आधी अंडे अशी अवस्था निर्माण झाली आहे. एस. टी. सुरु करीत असलेल्या लांब पल्याच्या फेऱ्यामध्ये अक्कलकोट, पंढरपुर, विजापूर आदी लांब पल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. ग्रामिण भागातील गाड्या नियमित सुरू झाल्या तरच प्रवासी उपलब्ध होतील.त्यामुळे आता लहान फेऱ्या कधी सुरू होतात याकडे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page