विकासकामांत राजकरण आणि तडजोड आपण करीत नाही

पालक्कमंत्री भेटीवेळी संजू परब यांचे विधान

*💫सावंतवाडी दि.२५-:* विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणि तडजोड आपण करत नाही. तसेच राजकारणात वाद विवाद असतात. त्या वादाला विकास कामात थारा नसतो असे स्पष्टीकरण आज सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी नगरपालिकेत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या भेटीवेळी केले आहे. सावंतवाडी शहरात मंजूर झालेल्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत हे शहरात आले असताना त्यांनी आज नगरपालिकेला भेट दिली होती. यावेळी बोलताना नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी नगरपालिका सर्वात मोठी नगरपालिका असल्याने या नगरपालिकेला विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच अग्निशमन केंद्र नसल्याने ते होण्यासाठी योग्य तो निधी द्यावा अशी मागणी यावेळी केली आहे. तसेच यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी नगरपालिकेची इमारत जुनी झाली असून, नुतनीकरण करण्यासाठी प्रस्ताव द्यावा असे सागितले असून, एका महिन्यात प्रस्ताव देवू असे नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page