जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मकलेश सुरु
*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ढासळलेली आरोग्य यंत्रणा आणि कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा रुग्णालयातील रिक्त असलेले जिल्हा शल्यचिकित्सक पद तसेच अन्य रिक्त पदे तात्काळ भरावीत . या मागणीसाठी “सतर्क पोलीस टाइम्स “च्या वतीने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हात कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची वाढती संख्या तसेच कोरोना रुग्णांचे वाढते मृत्यूचे प्रमाण व ढासळलेली आरोग्य यंत्रणा यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रूग्ण मृत्युवाढ व कोरोना रूग्णांचा पोझीटीव्ह रेट वाढत असल्याने जिल्हावासीयांची आरोग्याबाबतची चिंता वाढली आहे . राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशिक्षित डॉक्टर , परिचारिका व इतर वैद्यकीय स्टाफ यांची रिक्त पद कितेक वर्षापासून अद्यापही भरण्यात आलेल्या नाहीत , तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा शल्य चिकित्सक हे पद देखील रिक्त असल्याने कोरोना महामारीच्या काळातील प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सकावर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कारभार हाकला जात आहे . सिंधुदुर्ग जिल्ला हा शिक्षणामध्ये अग्रेसर असतांनाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक मुलांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने वैदकीय शिक्षण घेण्याकरिता दुसऱ्या जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागत आहे. ते शिक्षण सामान्य मुलांना खर्चिक होते . त्यामुळे भारतीय घटनेप्रमाणे विद्याथ्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार असतांनाही जिल्ह्यातील सामान्य घरातील मुले ही वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहत आहेत . याकरिता जिल्ह्यात शैक्षणिक दृष्ट्या सुसज्ज असे शासकीय वैद्यकीय रुग्णालय होणे काळाची गरज आहे. तसेच जिल्ह्यात मुलभूत अशी सुसज्ज आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील रुग्णांना गोवा राज्य , कोल्हापूर , मुंबई अशा ठिकाणी जावून उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक वाढीव खर्च सहन करावा लागत आहे ही जिल्ह्यातील वस्तुस्थिती आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ढासळलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे सध्या जिल्ह्यातील कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव व कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात होत असलेली जीवितहानी रोखण्यासाठी तसेच जिल्ह्यातील जनसामान्यांना वैद्यकीय मुलभूत सुविधा मिळून त्यांना वेळीच आजाराचे योग्य निदान होवून तात्काळ उपचार घेता यावे नागरिकांचे आरोग्य हे सदैव निरोगी राहावे. जिल्हावासीयांच्या आरोग्य विषयक मागण्या पूर्ण व्हाव्यात. याकरिता सतर्क पोलीस टाईम्स साप्ताहिक वृतपत्र , आरोग्य हक्क कृती समिती , सिंधुदुर्ग , भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था , सिंधुदुर्ग विभाग व मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट , सिंधुदुर्ग चे पदाधिकारी ,यांनी आज सकाळ पासून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत आत्मक्लेश उपोषणास सुरुवात केले आहे. या मागण्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे सादर केले आहे. या आंदोलनात राजन रेडकर, भूषण मांजरेकर सौरभ नागोळकर, राजाराम उर्फ आबा चिपकर, रीमा मेस्त्री सहभागी झाले होते. तर प्रसाद गावडे, अमोल जंगले, आशिष सुभेदार, प्रतीक राणे, जगन्नाथ राणे, रवींद्र राणे, प्रवीण भगत, राजेश सातोस्कर, नारायण मेस्त्री, विनय मेस्त्री आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली होती.
