भुईबांवडा घाट चाललाय खचत
दरवर्षी कोटयांनी खर्च करून परिस्थितीत सुधार नाही *वैभववाडी/प्रतिनिधी* भुईबावडा घाटमार्ग दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. दरवर्षी घाट मार्गावर कोट्यवधी रूपयांचा निधीही खर्च केला जातो. मात्र पावसाळा आला की घाटमार्ग आजारी पडतो. गतवर्षी घाट रस्त्याच्या मध्यभागी भेगा पडल्या होत्या. याठिकाणी केवळ मलमपट्टी करण्यात आली. मात्र वर्ष झाले तरी अद्यापही संबंधित विभागाने यावर कोणतीच ठोस उपाययोजना न केल्याने…
