अद्ययावत डाटा सेंटर सुरु करणारी राज्यातील पहिली सिंधूदुर्ग बँक

शरद पवार यांचे गौरोद्गार; ऑनलाईन केला डाटा सेंटर शुभारंभ

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* कोकणातील लोकांना परतावा दिल्याशिवाय झोप येत नाही. येथील लोक मरताना कर्ज ठेवत नाहीत. सभासदांचा बँकेवर असलेला विश्वास व बँकेला लाभलेले नीटनीटके नेतृत्व व त्यांचा कारभार यामुळे जिल्हा बँक हे यश गाठु शकली आहे. जिल्हा बँकेने आज सुरु केलेले अद्ययावत डाटा सेंटर महाराष्ट्रातील जिल्हा बँकेचे पहिले सेंटर आहे, असे प्रतिपादन देशाचे माजी संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यानी डाटा सेंटर उद्घाटन प्रसंगी बोलताना केले. सिंधूदुर्ग जिल्हा बँकेच्या अद्ययावत डाटा सेंटरचे उद्घाटन शरद पवार यानी ऑनलाईन पद्धतीने बटन दाबून केले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, कोल्हापुर पालकमंत्री बंटी पाटील ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. तर जिल्हा बँक सभागृहात बँक अध्यक्ष सतीश सावंत, आ वैभव नाईक, उपाध्यक्ष सुरेश दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक नीता राणे, प्रकाश गवस, प्रज्ञा परब, गुरुनाथ पेडणेकर, प्रदीप धुरी, दिगंबर पाटील, आत्माराम ओटवणेकर, अविनाश माणगावकर, विकास सावंत, आदी उपस्थित होते. तर व्हीक्टर डांटस शरद पवार यांच्या समवेत ऑनलाईन सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page